आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश उत्सवाचे शेवटचे 4 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ‘वाजवा रे..’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गणेश उत्सवाचे देखावे पाहण्यासाठी शेवटचे चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. आत्तापर्यंत गणेश उत्सवादरम्यान शेवटचे तीन आणि महालक्ष्मी दरम्यान एक दिवस सूट देण्यात येत होती. मात्र गणेश भक्तांच्या मागणीवरून आता शेवटचे चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत सूट देण्यात येणार आहे. छावणी येथील गणेश उत्सवाला मात्र ही सूट राहणार नाही, असे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितले. 
 
विसर्जन मिरवणुकीबाबत शनिवारी पोलिस आयुक्तालयात उपायुक्त राहुल श्रीरामे, विनायक ढाकणे, डॉ. दीपाली धाटे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात आदींच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. विसर्जन मिरवणुकीसाठी एनसीसी कॅडेट आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांची मदत घेण्याचे या वेळी ठरवण्यात आले. सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे संपूर्ण विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवले जाईल. विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या पोलिस ठाणेनिहाय बैठका सुरू आहेत. त्यांना प्रशिक्षण देऊन विसर्जन मिरवणुकीत तैनात केले जाईल, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. 
 
तक्रार आली तरच जुगारावर कारवाई : यादव 
शहरातील अनेक गणेश मंडळांच्या मंडपात सर्रास जुगाराचे अड्डे सुरू आहेत. पोलिस आयुक्त यशस्वी यादव या जुगार अड्ड्यांवर कारवाईसाठी तक्रार येण्याची वाट पहात आहेत. कोणाची तक्रार आली तर लगेच कारवाई करू, असे ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...