आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंच गणेशमूर्ती बनवण्यामध्ये सोलापूर शहराचीच कीर्ती,मोठ्या मूर्तींच्या किमती दोन लाख रुपयांपर्यंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पौराणिककथेतल्या प्रसंगातील भगवंताच्या प्रतिकृती, विष्णूची अनेकविधे रूपे, कृष्णलीला समोर ठेवून गणेशमूर्ती बनवण्याची परंपरा सोलापुरातून सुरू झाली. त्यानंतर इतिहासातील महापुरुषही या मूर्तीतून उभे राहिले. शहरातील मूर्तिकारांच्या या कलेला आता परप्रांतात प्रचंड मागणी वाढली. कर्नाटक, तेलंगण आणि आंध्रातल्या शेवटच्या टोकापर्यंत या मूर्ती जात आहेत. तिरुमला तिरुपती येथील गणेशभक्तही सोलापूरच्या मूर्तींची निवड करतात. यंदाच्या गणेशोत्सवासाठीही अशीच मोठी मागणी नोंदवली गेली. त्या बनवण्यात मूर्तिकार सध्या व्यस्त आहेत.
वईटला बंधू, राजू गुंडला, मंजुळे बंधू, गणेश बडगू, अमर कनकी ही मूर्तिकार मंडळी आगळ्या-वेगळ्या मूर्ती बनवण्यात पारंगत आहेत. एक वर्ष अगोदर नोंदणी करूनच ते कामाला सुरुवात करतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर त्यांची ही कला त्यांच्या गोदामातच दिसून येते. प्रतिष्ठापनेच्या दोन दिवस अगोदर ही गोदामे रिकामी होतात आणि त्यांचा हंगाम संपतो. यात मोठे अर्थकारण अाहे. रोजगार आहे आणि सोलापूरची कीर्तीही. मूर्तिकलेत सोलापूरने आता नगरला मागे टाकले अाहे. तेथील मूर्तिकारांहूनही उत्कृष्ट मूर्ती बनवण्याची कला सोलापूरच्या मूर्तिकार बंधूंनी आत्मसात केली. ती सर्वदूर पोहोचण्याच्या कामालाही लागले.
सगळ्या मूर्ती जातात दक्षिणेतील शहरांत
विजापूर,गुलबर्गा, उस्मानाबाद, लातूर येथून उंच मूर्तींची मागणी असते. अलीकडे बंगळुरू, तिरुपती, आदोनी, सिकंदराबाद, हैदराबाद येथून मागणी वाढली. त्यामुळे सोलापूरच्या गणेशभक्तांसाठी काम करता येत नाही, याची खंत वाटते. दीपकवईटला, मूर्तिकार
अशा आहेत यंदाच्या मूर्ती
१८ फूट लाल बागचा राजा :बिदर
१६फूट नंदीवरील महादेव :रायचूर
१५फूट उंच शिर्डीके साईबाबा :सिकंदराबाद
१४फूट उंच मत्स्यावतार विष्णू :गुलबर्गा
१२फूट उंच भगवान व्यंकटेश्वर :तिरुपती
१०फूट उंच मीरेच्या वीणेवरील गणेश :आदोनी
११फूट उंच मृषकाने कडेवर घेतलेली मूर्ती :शाबाद
अशा आहेत मूर्तींच्या किमती
१५ते २० फूट उंच मूर्तीच्या किमती लाखांपर्यंत आहेत. १० फूट उंचीच्या मूर्ती साधारण लाख २० हजार ते दीड लाखांपर्यंत आहेत. एकूण २० मूर्तिकारांकडे अशा मोठ्या मूर्ती बनत आहेत. साधारण ६० कलावंत त्यासाठी काम करत आहेत.
मत्स्य-अश्वावरील महादेवाच्या रुपातील गणेश वईटला बंधूंनी साकारला आहे.
- अवाढव्य नगाऱ्यावर एका पायावर नाचणारा गणराज
- संत मीराबाईच्या वीणेवर उभा असलेला कृष्णगणेश
- महादेवाची पिंड खांद्यावर घेतलेल्या बाहुबलीच्या रूपातील गणेश
- जय मल्हार मालिकेतील खंडेरायाच्या रूपातील गणेश