आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्‍यभरात ढोलताशांच्‍या गजरात लाडक्‍या बाप्‍पाला निरोप, पाहा फोटोज आणि व्हिडिओज...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव महानगरपालिकेतर्फे भिलपुरा चौकात उभारण्यात आलेल्या स्वागत मंडपात मुस्लीम बांधवांनी मान्यवरांचे स्वागत केले व विर्सजन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली. - Divya Marathi
जळगाव महानगरपालिकेतर्फे भिलपुरा चौकात उभारण्यात आलेल्या स्वागत मंडपात मुस्लीम बांधवांनी मान्यवरांचे स्वागत केले व विर्सजन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली.
औरंगाबाद- 12 दिवस मुक्‍कामी असलेल्‍या लाडक्‍या बाप्‍पाला निरोप देण्‍यासाठी राज्‍यभरात विसर्जनाच्या मिरवणुकींना ढोल-ताशांच्‍या गजरात सुरुवात झाली आहे. मुंबई-पुणे शहरांसोबतच  जळगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्‍हापूर, नागपूर या शहरांमध्‍येही मानाच्‍या गणपती मिरवणुकींना सकाळपासुनच सुरुवात झाली आली आहे. मिरवणुकीमध्‍ये युवक-युवती, लहान मुले, महिला व ज्‍येष्‍ठही पारंपारिक वेशभुषेत उत्‍साहात सहभागी होताना दिसत आहेत. अनेक शहरांत मिरवणुक मार्गामध्‍ये रांगोळ्या काढल्‍या आहेत, गुलालाची उधळण, लेझीम असे खेळ खेळले जात आहेत.  
 
पोलिसांचा चोख बंदोबस्‍त 
मिरवणुका जल्लोषात आणि सुरक्षित वातावरणात व्हाव्यात यासाठी राज्‍यभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्‍यात आला आहे. मुख्‍य शहरांतील मिरवणुकांमध्‍ये सीसीटीव्‍ही कॅमे-याद्वारे लक्ष ठेवण्‍यात येणार असून रोड रोमिओ पथकेही तैनात करण्‍यात आली आहेत.   
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, राज्‍यभरातील गणेश विसर्जन मिरवणुकींचे फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...