आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतींची आज निवड करण्यात आली. त्यामध्ये नियोजन व वित्त समितीच्या सभापतिपदी मंगलाबाई अर्जुनसिंग राजपूत, यांची तर बांधकाम सभापतिपदी अविनाश शेषराव पाटील यांची निवड करण्यात आली.
 
इतरांमध्ये आरोग्य व स्वच्छता सभापतिपदी पल्लवी आबासाहेब सिरसाठ, पाणीपुरवठा सभापतिपदी सोनाली योगेश पाटील, महिला व बालकल्याण सभापतिपदी ऊर्मिला मारोती खैरे यांची निवड करण्यात आली. या वेळी नवनिर्वाचित सभापतींचा नगराध्यक्षा वंदना पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी नगरसेवक व पदाधिकारी  उपस्थित  होते.
बातम्या आणखी आहेत...