आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौताळा अभयारण्यात दहा मे रोजी होणार प्राणी गणना, गणनेसाठी बनवले मचान, 39 पाणवठे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- बुद्धपौर्णिमेच्या दिवशी गौताळा अभयारण्यातील वन्यजीव प्राण्यांची गणना करण्यात येणार असून हे वन्यजीव बघण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळणार असल्याने अभयारण्यात याबाबतची तयारी करण्यात आल्याची माहिती सहायक वनरक्षक पी. व्ही. जगत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मराठवाड्यातील सर्वांत मोठे मानले जाणारे गौताळा अभयारण्य हे २६० चौ.कि.मी.क्षेत्रात पसरलेले असून यात बिबट्या, नीलगाय, तडस, रानडुक्कर, कळवीट, लांडगा, कोल्हा, भेकड, सायाळ, रानमांजर, ससा आदींसह सरपटणारे प्राणी आढळून येतात. अभयारण्यातील वन्यजीवांमध्ये वाढ किंवा घट झाली. यासाठी दरवर्षी प्राणी गणना केली जाते. या वेळी १० ते ११ मेच्या दुपारी बारा वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधीत पाणवठ्यावर येणाऱ्या सर्व प्राण्यांची गणना होणार आहे. 

यासाठी निसर्गप्रेमी, अशासकीय संस्था, निसर्गप्रेमी नागरिकांची मदत घेण्यात येणार असून नैसर्गिक कृत्रिम एकूण ३९ पाणवठ्यांवर निसर्गप्रेमींसाठी मचानावर बसून प्राणी गणना करण्याची संधी मिळणार अाहे. यासाठी २४ तास सलग मचानावर बसून राहावे लागणार असल्याने याबाबत नियम घ्यावयाची काळजी या संबंधी औरंगाबाद येथे कार्यशाळा घेण्यात आली आहे. तसेच कन्नड चाळीसगाव येथे कार्यशाळा घेण्यात येणार असून प्राणी गणनेसाठी कृत्रिम पाणवठ्यावर पाणी भरणे, मचानी बांधणे आदी कामे करण्यात आली आहेत. या प्राणी गणना कार्यक्रमातून गौताळा अभयारण्यात असलेल्या वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ किंवा घट याचा अंदाज येणार तसेच एखादा वन्यजीव अभयारण्यात वास्तव्यास आला असल्यास त्याचा पण अंदाज प्राप्त होणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक जगत यांनी दिली. कन्नड वनपरिक्षेत्र अधिकारी आर. ए. नागपूरकर, नागद वनपरिक्षेत्र अधिकारी बी. बी. जऱ्हाड यांची उपस्थिती होती. 

बुद्धपौर्णिमेच्या रात्री गौताळा अभयारण्यात असलेल्या वन्यप्राण्यांची मोजदाद करण्यासाठी वन विभागाच्या वतीने पाणवठे, मचान बनवण्यात आले असून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...