आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौताळा दांडगाई : अधिकाऱ्यानेच केली मुलांची सोय, प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गौताळा अभयारण्यात मुलांनी केलेली दांडगाई त्याच्यासह अभयारण्यातील कर्मचाऱ्याच्या अंगलट आली आहे.विभागीय वन्यजीव अधिकारी कमलाकर धांडगे यांच्यासह उपविभागीय वन्याजीव अधिकारी पी.व्ही.जगत यांनी गौताळयात त्या रात्री जबाबदारी झटकून अनुपस्थीत असलेल्या सर्वच पंधरा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा काढल्या व जवाबही नोंदवले.दांडगाई करण्याऱ्या मुंलांनाही कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या आहेत.या मुलांची सोय औरंगाबादच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच केल्याचे तपासात समोर आले आहे.

दिव्य मराठीतून हे वृत्त प्रकाशित होताच वनविभाग खडबडून जागा झाला गौताळा अभयारण्यातील सुरक्षेवरच प्रश्न चिन्ह लागले.वनविभागाच्या नियमानुसार गौताळ्यात रात्री थांबण्याची सोय नाही तेथे छोटी डॉरमेटरी आहे (तात्पुरती निवास व्यवस्था)असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे परंतु जंगलाची आणि वन्यजीवांची काळजी नसलेला मात्र पर्यटनवार भर देणारा हा विभागअनेक वर्षापासून पर्यटकांना ४०० ते ६०० रुपये शुल्क घेऊन व्हीआयपी सूट बहाल करीत असतो. याच ठिकाणी  तरुणांनी मुक्काम केला होता. शिवाय उत्तररात्री जंगलात घुसून आतील फोटो काढले.हे फोटो फेसबुकवर व्हायरल होताच गौताळ्याचा पत्ता मुंबई- पुणे सह राज्यभरातील निसर्गप्रेमी विचारु लागले.यासर्वच प्रकारामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सध्या येथे कडक सुरक्षा व्यवस्था लावली असून सायंकाळी सहा नंतर थांबण्यास परवानगी नाकराण्यात येत आहे.

पाणवठे आटले,सावधानतेचा इशारा..
दरम्यान प्रचंड तापमानामुळे गौताळ्यातील पाणवठे आटले आहेत.त्याची व्यवस्था केली जात आहे शिवाय पाण्याच्या भटकंतीत प्राणी जंगलातील रस्त्यावर येतात त्यामुळे सध्या तेथे सावधानतेचा इशारा दिला आहे.

मुलांच्या अर्जात रिसर्चला उल्लेखही नव्हता..
विभागीय वन्यजीव अधिकारी धांडगे यांनी दिव्य मराठीला सांगितले की बातमी मुळे जंगलात सुरु असेला प्रकार मला कळला आता अशी दांडगाई करणाऱ्यांची कसून तपासणी  होईल.त्या मुलांच्या अर्जांत रिसर्च करण्यास आल्याचा कोणताही उल्लेख नव्हता.दांडगाई करणाऱ्या तरुणांनी प्रत्यक्षात जळगावच्या एका वरिष्ठ वनअधिकाऱ्याच्या सांगण्यावरुन औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयातील  वरिष्ठ अधिकाऱ्याने मुलांची सोय केल्याचे  उघडीस आले आहे.

कायदयानुसार गुन्हा दाखल होतो..
वन्यजीव कायदा १९७२ प्रमाणे सुर्यास्तानंतर अभयारण्यात फिरताच येत नाही.रात्री फिरण्याची परवानगी दिली नसेल तर त्या मुलांवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे होते.मुंबईत फिल्मसिटीत फक्त साप हाताळल्या बध्दल एका अभिनेत्रीला दोन दिवस कारावास भोगावा लागला.हे ताजे उदाहरण आहे.यामुलांसह जबाबादार कर्मचारी अधिकाऱ्यांवर वन्यजीव कायद्या नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. - राजेंद्र धोंगडे,निवृत्त वनअधिकारी व वन्यजीव कायदे तज्ञ
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...