आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीत 2200 कर्मचाऱ्यांची अास्थापना सांभाळणारे अडगळीत, पुरेसा उजेडही नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दररोज हजारो रुग्णांना सेवा देणाऱ्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मागील १० वर्षांच्या काळात मूत्ररोग विभाग, सीव्हीटीएस, मेडिसीन, कर्करोग रुग्णालय आणि सुपरस्पेशॅलिटी अशा इमारतींचे बांधकाम झाले. एकीकडे कर्मचाऱ्यांअभावी या इमारतींचा १०० टक्के वापर होत नाही, तर दुसरीकडे २२०० कर्मचाऱ्यांची आस्थापना सांभाळणाऱ्या १० ते १२ कर्मचाऱ्यांना अडगळीत बसून काम करावे लागत आहे.
 
साठ वर्षांपूर्वी बांधलेल्या घाटी रुग्णालयात काळाच्या ओघात अनेक बदल होत गेले. रुग्णहिताच्या दृष्टीने इमारतीही बांधण्यात आल्या. मात्र, यासोबतच महत्त्वाचा असलेला कर्मचारी वर्ग, त्यांच्या बसण्याच्या जागा अन् त्यांना कार्यालयात काम करताना आवश्यक असलेले उत्तम वातावरण तयार करण्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. सर्वत्र साचलेली धूळ, अपुरा उजेड अशाच स्थितीत हे या विभागात कर्मचारी काम करत आहेत. विशेष म्हणजे आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास त्यांना जीव वाचवून बाहेर पडण्यास जागाही मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे.
 
रुग्णालयात कार्यरत असलेल्या वर्ग आणि वर्ग अशा एकूण २२०० कर्मचाऱ्यांची अास्थापना पाहणाऱ्या लिपिकांना अक्षरश: अडगळीत बसावे लागत आहे. विशेष म्हणजे १९८९ पासून हे कर्मचारी याच ठिकाणी बसतात. कर्मचारी बसत असलेल्या ठिकाणी व्हेंटिलेशन, पुरेसा उजेड येथे नाही. जागेवर जाण्यासाठी त्यांना सामानातून वाट काढावी लागते. फायलींचे गठ्ठे येथेच पडून आहेत. अनेक जुनी कागदपत्रेही तिथेच धूळ खात आहेत.