आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीचा जामीन फेटाळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अल्पवयीनमुलीवर अत्याचार करणारा आरोपी सुरेंद्र गणपत उघडे (रा. सातारा परिसर) यांचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एस. एस. नायर यांनी फेटाळला.
 
आरोपी हा फिर्यादीच्या घरात भाड्याने राहत होता. २०१५ मध्ये आरोपीने घरात कोणी नसताना फिर्यादीस घरात बोलवून तिचे फोटो फेसबुकवर टाकण्याची आणि आई-वडिलांना मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. तिने ही गोष्ट आई-वडिलांना सांगितली. आरोपीने फिर्यादीसोबत लग्न करण्याचे आश्वासन देऊन पुन्हा अत्याचार करत तिला दिल्ली येथे पळवून नेले. तिचे वय १८ वर्षे झाल्यानंतर तिच्याशी औरंगाबाद येथील एका मंदिरात विवाह केला. 

या नंतर आरोपी तिला सतत मारहाण करत असल्याने तिने जानेवारी रोजी पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ती वर्ग होताच सातारा पोलिसांनी आरोपीस जानेवारी रोजी अटक केली. त्यास आधी पोलिस कोठडी तर नंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज केला असता सहायक सरकारी वकील अजित अंकुश यांनी आरोपी फिर्यादीस धमकावण्याची शक्यता असून जामीन नामंजूर करण्याची विनंती केली. 
बातम्या आणखी आहेत...