आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

90 टक्क्यांहून अधिक शाळांमध्ये नाही त्या दिवसांसाठी व्यवस्थापन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ९० टक्क्यांहून अधिक शाळांमध्ये किशोरवयीन शाळकरी मुलींसाठी स्वतंत्र कक्षा सोडा, पण मासिक पाळीच्या दरम्यान शाळेत स्वतंत्र रूम अथवा स्वच्छता कक्षाच नाही. शिवाय ७० टक्के मुली या काळात गैरहजर राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून आता शालेय स्तरावर मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.


प्रथम पाळी येणाऱ्या मुलीशी आईने जी मैत्रीपूर्ण भूमिका साकारायची असते. त्यापेक्षा मुलीने काय करू नये. याचाच पाढा वाचला जातो. त्यामुळे प्रभावी अंमलबजावणीची महापालिका आयुक्त (शहर), जिल्हा परिषद मुख्याधिकारी, मुख्याधिकारी पालिका यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. समितीवर या क्षेत्रात कार्यरत अभ्यासूंना निमंत्रित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करताना मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणात तडजोड न करण्याची जबाबदारी असणार आहे. तसेच  महिला प्रतिनिधींचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पहिल्या टप्प्यात होईल. या प्रशिक्षणात महिला जिल्ह्यातील सर्व महिला शिक्षकांचे प्रशिक्षण घेतील.

 

जागरूकतेचा अभाव 

 ग्रामीण भागात  महिला शिक्षकदेखील नाहीत. दुर्गम भागात अडचणी सर्वाधिक आहेत. त्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक जनजागृतीे  करत आहोत, असे सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाच्या डॉ. सई पाटील यांनी सांगितले.

 

मुली घरी जातात
आमच्या शाळेत व्हेंडिंग मशीन आहे. परंतु स्वतंत्र कक्ष अशी व्यवस्था अनेक शाळांमध्ये नाही. ज्या मुलींना त्या दिवसांत काही त्रास वाटला तर त्या विचारून घरी जातात, असे शारदा मंदिर शाळेच्या शिक्षिका उज्ज्वला निकाळजे म्हणाल्या.

 

गैरहजेरी होती

त्या दिवसांसाठी पूर्वी गैरहजेरी असायची.आता ते प्रमाण तसे कमी आहे. परंतु याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता आणि माहिती देणे आवश्यक आहे.
-संध्या काळकर, मुख्याध्यापिका, कलावती चव्हाण माध्यमिक विद्यालय

 

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 

- १२ % मुली पाळी दरम्यान शाळेत गैरहजर 

- भारतात तर याविषयी बोलणेही टाळण्यात येते. 

- युनिसेफने केलेल्या एका सर्वेक्षणात तर ११ ते १९ वयोगटातील केवळ 
१३ टक्के मुलींना पहिली पाळी येण्याअगोदर पाळीबाबत माहिती आहे. 

- या अहवालानंतर शासनाला जागा आली असावी अशी चर्चा महिला शिक्षकांमध्ये आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...