आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठातील मुंडे संस्थेच्या अभ्यासक्रमांना ३८ विद्यार्थी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकनेते गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्थेने जाहीर केलेल्या १७ पैकी अभ्यासक्रमांना ३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पैकी २६ विद्यार्थ्यांनी सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी, तर १२ जणांनी पाचदिवसीय सर्टिफिकेट कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे. १३ ते १७ डिसेंबरपर्यंत सर्टिफिकेट कोर्सची शिकवणी होईल. पदविकासाठीची शिकवणी १५ मे २०१७ पर्यंत सुरू राहणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ निधीतून कोटींची प्रशासकीय इमारत उभारून केंद्राचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे. १५ जानेवारीला भूमिपूजन होण्याची शक्यता आहे.
संस्थेचे मानद संचालक डॉ. सर्जेराव ठोंबरे आणि कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी २५ ऑगस्ट २०१६ रोजी पत्रकार परिषद घेऊन मुंडे संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली होती. सहा महिन्यांचे पदविका अभ्यासक्रमांचे नऊ, तर तर एक आठवडा कालावधी असलेले सर्टिफिकेट कोर्स त्या वेळी जाहीर करण्यात आले होते. फळे भाजीपाला प्रक्रिया, जल भूमी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, फलोद्यान, फुलोद्यान रोपवाटिका व्यवस्थापन, रोपांची ऊती संवर्धन, पशुधन उत्पादन व्यवस्थापन, मधुमक्षिका पालन व्यवस्थापन, मत्स्यपालन, महिला बालकांचे जीवनसत्त्व आदी पदविका अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे. पंचायतराज, स्वयंसहायता बचत गट, फळे भाजीपाला प्रक्रिया, रोपांचे ऊती संवर्धन, ज्येष्ठ नागरिक सेवाशूश्रुषा आदी पाच दिवसांचे आठ निवासी प्रमाणपत्र अभ्यासक्रमही जाहीर केले होते. मुंडे संस्थेच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला तर १७ पैकी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. त्यापैकी अभ्यासक्रम सहा महिन्यांचे असून पाचदिवसीय अभ्यासक्रम आहे. चारही अभ्यासक्रमांची शिकवणी प्राणिशास्त्र विभागाच्या वर्गखोलीत सध्या सुरू आहे. १५ नोव्हेंबरपासून हे वर्ग सुरू झाले असून १५ मे २०१७ पर्यंत सुरू राहणार आहे. फळे भाजीपाला प्रक्रिया या पाचदिवसीय कोर्सची शिकवणी १३ डिसेंबरपासून केमिकल टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. भगवान साखळे घेणार आहेत. १७ डिसेंबरला हा कोर्स पूर्ण होणार आहे. दुसऱ्या विभागाच्या वर्गखोल्यांमध्ये सर्व अभ्यासक्रम सुरू असल्यामुळे मुंडे संस्थेचा लवकरच विस्तार करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

विद्यापीठाच्या खर्चाने कोटींची इमारत बांधणार- : विद्यापीठाच्याखासगी निधीतून या संस्थेसाठी पाच कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यापैकी कोटी रुपयांतून प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. मध्यवर्ती ग्रंथालयाच्या पाठीमागे विद्यापीठाने मुंडे संस्थेला जमीन दिली असून येथेच १५ जानेवारी २०१७ रोजी भूमिपूजन होणार आहे. उर्वरित कोटीत साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. विद्यापीठातील सर्व फळबागा भविष्यात मुंडे संस्थेकडे वर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे.
मुंडे संस्थेसाठी विद्यापीठाने ३२३ कोटींचा राज्य सरकारकडे रीतसर प्रस्ताव दाखल केला होता. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळाने १५० कोटी जाहीर केले आहेत. जाहीर झालेल्या पैशांच्या विनियोगासाठी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली.

^मराठवाड्याच्या विकासासाठीही संस्था महत्त्वाचे कार्य करणार आहे. विद्यापीठात आम्ही स्मार्ट व्हिलेज साकारणार आहोत, त्यासाठी अडीच कोटी खर्च अपेक्षित आहे. प्रतिसाद बघून कोर्स सुरू करण्यात येईल. तूर्त जागेचा प्रश्न असल्यामुळे विद्यापीठाच्या निधीतून कोटींची प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. १५ जानेवारीला भूमिपूजन योजिले आहे. -डॉ.सर्जेराव ठोंबरे, मानद संचालक

अ/क्र अभ्यासक्रमाचे नाव प्रवेश क्षमता प्रवेश झाले
१. जल भूमी व्यवस्थापन ३० १३
२. पशुसंवर्धन व्यवस्थापन ३० ०७
३. सेंद्रिय शेती ३० ०५
४. मत्स्यपालन व्यवस्थापन ३० ०१
५. फळे भाजीपाला प्रक्रिया (पाचदिवसीय) ३० १२
बातम्या आणखी आहेत...