आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्‍या हॉस्‍टेलात पंकजांना करमत नव्‍हते, बाबांना पाहून त्‍यांनी दप्तर गुंडाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बीड जिल्हा ते महाराष्ट्र आणि दिल्लीपर्यंतच्‍या राजकारणात मजल मारणारे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज (दि. 12) जन्‍मदिवस. मुंडे आणि प्रमोद महाजन या जोडीने राज्यातील वातावरण ढवळून काढले होते. महाजन यांच्‍या प्रभावातून घडलेले गोपीनाथ मुंडे यांचे खासगी आयुष्‍य संघर्षमय होतेच. पण त्‍यातील काही गमतीदार प्रसंगही या लोकनेत्‍याच्‍या विविध पैलूंचे दर्शन घडतात. या संग्रहात वाचूया गोपीनाथराव आणि पंकजा मुंडे यांच्‍या काही खास आठवणी..

2009 ते 2014 या काळात गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांना कौटुंबिक आणि राजकीय पातळीवर जिल्ह्यात मोठा संघर्ष करावा लागला. पण पंकजाताईही मागे हटल्‍या नाहीत. पंकजा मुंडे हे राजकीय व्‍यक्‍तिमत्‍त्व घडवणारे गोपीनाथराव तेवढेच कुटुंबवत्‍सलही होते. दिवसभरातून ते कुटुंबासाठी आवर्जून वेळ काढत.

वसतिगृहात भेटायला आले होते गोपीनाथराव
पंकजाताईंच्‍या महाविद्यालयीन शिक्षणाला औरंगाबादहून सुरूवात झाली. औरंगाबादच्‍या सरस्वतीभूवन महाविद्यालयात त्‍यांनी अकरावीत प्रवेश घेतला. परंतु, त्‍या कधीच घर सोडून एकट्या राहिलेल्‍या नव्‍हत्‍या. त्यामुळे औरंगाबादला दोन महिन्यांचा कालावधी वसतिगृहात काढला. तेथे त्‍यांना करमत नव्हते. एक दिवस बाबा भेटायला आले. बाबांना पाहून पंकजाने आपले दप्तर गुंडाळले, त्‍या गाडीत बसल्‍या नि शिक्षण सोडून थेट परळी गाठले. परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयात त्‍यांनी अकरावीला प्रवेश घेतला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अशाच काही आठवणी..