आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय योजना: टँकरमुक्तीसाठी शहरांत जलयुक्त शिवार अभियानाचा नवा पर्याय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - दुष्काळमुक्त गावे करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. बीड जिल्ह्यात या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू अाहे. पावसाने साथ दिल्याने जिल्हाभरातील ५०० हून अधिक गावे टंचाईमुक्त झाली अाहेत. दुसऱ्या टप्प्यातही निवडलेल्या गावांमध्ये कामे सुरू अाहेत. ग्रामीण भागातील जलयुक्तच्या कामांचे यश पाहता नगरपालिकांच्या हद्दीमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा अध्यादेश राज्य शासनाने काढला अाहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण भागासह शहरी भागही टँकरमुक्त हाेणार अाहेत. 
 
बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये २७१ गावांमध्ये माेठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात अाली. त्यानंतर पावसाने जाेरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील गावे टंचाईमुक्त हाेणे शक्य झाले अाहे. तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील २५६ गावे निवडली असून तेथेही जलद गतीने कामे सुरू अाहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सुमारे पाच हजार गावे टंचाईमुक्त झाल्याने राज्य शासनाने शहरी भागांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा अध्यादेश सहसचिव वि. सि. वखारे यांनी काढला अाहे. यात वर्ग दर्जाचा पालिका अाणि नगरपंचायतींचा समावेश झाला असून यात बीड जिल्ह्यातील धारूर, गेवराई पालिकांसह, अाष्टी, पाटाेदा, शिरूर कासार, वडवणी केज नगरपंचायतींचा समावेश अाहे. त्यानुसार जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी जिल्ह्यातील धारूर अाणि गेवराई तसेच नव्याने स्थापन झालेल्या पाच नगरपंचायतींनी शहराच्या भाैगाेलिक स्थितीचा अभ्यास करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले अाहेत. 

नागरी जलयुक्त शिवार अभियान : याअभियानांतर्गत वर्ग नगरपालिका नगरपंचायतींमध्ये नद्या, नाले, अाेढे यांचे खोलीकरण, रुंदीकरण कामे केली जाणार अाहेत. 

- जलयुक्त शिवार अभियानात बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वोत्कृष्ट कामे झाली. त्याच धर्तीवर वर्ग दर्जा असलेल्या पालिका क्षेत्रातही जलयुक्त अभियान राबवले जाईल. ग्रामीण भागासह शहरी भागही टँकरमुक्त केले जाईल. ज्या शहरी भागांत जलसंधारणाची कामे शक्य अाहेत, भाैगाेलिक स्थितीनुसार जलपुनर्भरणाची कामे केली जातील.
-नवल किशाेर राम, जिल्हाधिकारी 
 
बातम्या आणखी आहेत...