आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्तिलढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात घ्या; राज्यपाल राव यांची अपेक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाडा मुक्तीसाठी हिंदू-मुस्लिमांसह सर्व समाजांनी एकत्रित लढा दिला होता.  हा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा यासाठी त्याचा समावेश पाठ्यपुस्तकात करावा, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी व्यक्त केली. क्रांती चौकात उभारलेल्या स्वातंत्र्यसंग्राम स्मारक व २१० फूट उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभ लोकार्पण कार्यक्रमात ते बाेलत हाेते.   

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, इम्तियाज जलील, संजय शिरसाट, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, महापौर नंदकुमार घोडेले,  जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, समन्वयक राम भोगले, मानसिंग पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.  राज्यपाल म्हणाले, औरंगाबाद  ऐतिहासिक शहर आहे. या ध्वजामुळे शहराला जागतिक स्तरावर ओळख निर्माण होईल. १८५७ चा उठाव, १९४७ स्वातंत्र्य लढा आणि १७ सप्टेंबर १९४८ मराठवाडा मुक्तिसंग्राम अशा तिन्ही संग्रामांची प्रेरणा इथून मिळेल. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले नसते तर जनतेच्या आजच्या स्थितीची कल्पनाही करवली गेली नसती. देशाचा नकाशा अपूर्ण राहिला असता’, असे राज्यपाल म्हणाले.
 
बातम्या आणखी आहेत...