आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगतीची वाटचाल: ग्रा.पं.चे रुपडे आता गुलाबी; पैठण तालुक्यातील ३३ ग्रामपंचायती आयएसओसाठी पात्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- अधिकाऱ्यानेठरवले तर गावपातळीवर कसे मोठे चांगले बदल होतात, याचे उत्तम उदाहरण पैठण तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या विकासावरून दिसून येते. सहायक गटविकास अधिकारी उषा मोरे यांच्या विशेष प्रयत्नातून पैठण तालुक्यातील सुमारे ३३ ग्रामपंचायतींची वाटचाल आयएसओच्या दिशेने सुरू आहे. जयपूरप्रमाणे पैठणची ओळख आता पिंक पैठण अशी होत असल्याचे गावात पाहिल्यावर दिसून येते. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात जास्त ३३ ग्रामपंचायती आयएसओच्या दृष्टीने तयारी करता, गावाचा बदल झाला पाहिजे या उद्देशाने काम करत आहेत. आॅगस्ट महिन्यातच इतर ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण होणार असल्याने आता पैठणच्या ग्रामीण भागाची ओळख खऱ्या अर्थाने गुलाबी िकंवा पिंक पैठण अशी होईल.

पहिल्या टप्प्यातील १५ ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण झाले. त्यात पांगरा, कृष्णापूर, कडेठाण, म्हारोळा, रांजणगाव, इमामपूर, बाभूळगाव, इसारवाडी, मुधलवाडी, धनगाव, वाहेगाव या पंधरा ग्रामपंचायतींचे लेखा परीक्षण झाल्याने या ग्रामपंचायती आता आयएसओसाठी सज्ज असल्याची माहिती आहे. शिवाय या ग्रामपंचायतींतील ग्रामस्थांचा सहभाग पाहून इतर तालुक्यांतील ग्रामपंचायतींनीही प्रेरणा घेऊन आयएसओची तयारी सुरू केली असल्याने आता एकूण ३३ ग्रामपंचायतींना आयएसओ मिळणार आहे. शिवाय आयएसओसाठी पात्र गावात रंगरंगोटी, कार्पेट, पडदे, सीसीटीव्ही कॅमेरे, वृक्षारोपण, गरोदर मातांसाठी मदर केअर संेटर, १०० टक्के कर भरणाऱ्याला मोफत दळणाची सुविधा, गावाचे सुशोभीकरण, कचराकुंड्या, अंगणवाडी, शाळांसह शासकीय कार्यालयांना सर्वत्र एकच गुलाबी रंग दिला जााणार असल्याने आता पैठणची आेळख नव्याने पिंक पैठण म्हणून होणार, यात शंका नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायती पैठण तालुक्यात आहेत. त्यात एकूण १०७ ग्रामपंचायती असून त्यापैकी ३३ ग्रामपंचायतींची आयएसओसाठी निवड झाल्याने गावांची ओळख कायापालट होणार आहे.

आयएसओच्या माध्यमातून गावाच्या विकासासोबत गाव सुंदर, स्वच्छ होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायती पैठण तालुक्यातील निवडल्या गेल्याने आता गावाची ओळख गुलाबी गाव अशी होणार आहे. उषामोरे, सहायक गटविकास अधिकारी
नवी ओळख मिळणार
या३३ गावांत आजपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयांना रंगरंगोटी नव्हती. आता पैठण तालुक्यातील निवड झालेल्या ग्रामपंचायतींना गुलाबी रंग देण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यालयाला नवी ओळख मिळणार आहे. इतर कार्यालयांनाही गुलाबी रंग असल्याने गावांची ओळख गुलाबी गावाच्या नावाने होणार, यात शंका नाही.

प्रथमच सीसीटीव्ही कॅमेरे
पैठणतालुक्यातील बाभूळगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रथमच शहराप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार असल्याने आता कर्मचारी सर्वांवर ग्रामपंचायतींची नजर राहणार आहे. गावात काही अनुचित प्रकार घडल्यास या कॅमेऱ्यांची मदत होणार आहे.

ही गावे आयएसओसाठी पात्र
आडूळ,बाभूळगाव, बिडकीन, बोकूड जळगाव, ७४ जळगाव, चितेगाव, धनगाव, ढाकेफळ, इसारवाडी, इमामपूर, हर्षी बु., हर्षी खु., जांबळी, कारकीन, कृष्णापूर, कातपूर, कोडगाव, कोळी बोडखा, मुधलवाडी, मुलाणी वाडगाव, पांगरा, शेकटा, पोरगाव, रांजणगाव, पिंपळवाडी, सोमपुरी, फारोळा अशा एकूण ३३ ग्रामपंचायती आयएसओच्या दिशाने मार्गक्रमण करत आहेत.

गावाचा विकास आयएसओच्या माध्यमातून होत आहे. यात ग्रामस्थांचा सहभाग मोठा असल्याने गावच्या विकासाला हातभार लागला आहे. बोबडे,सरपंच, इसारवाडी
पैठण तालुक्यातील बाभूळगाव ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत. गुलाबी रंगाने प्रसन्नता वाढली आहे. छाया: दिव्य मराठी
बातम्या आणखी आहेत...