बीड - मागील वर्षी १५० ते २०० रुपये किलाेपर्यंत गेलेल्या डाळींच्या किमती आवाक्यात आल्या आहेत. पीकपाणी चांगले राहिल्याने डाळीच्या किमती किलोमागे ५० ते ६० रुपयांनी घसरल्या. त्यामुळे ग्राहक सुखावले अाहेत.
तब्बल तीन वर्षांनंतर झालेल्या चांगल्या पाऊसमानामुळे खरिपातील तूर, मूग, उडदाचे चांगले उत्पादन झाले. रब्बी हरभऱ्याचे चांगले पीक लक्षात घेता किराणा बाजारात तूर व हरभरा डाळींचे भाव अाणखी घसरण्याचे संकेत अाहेत. ठाेेक बाजारात चणा डाळीचे भाव किलाेमागे ५० ते ६० रुपये, तूर डाळ ६५ रुपये, मूग डाळ ३० रुपये, मसूर डाळ ५ रुपये, उडीद डाळ ५० तर मटकी डाळ किलाेमागे २० रुपयांनी स्वस्त झाली. दीड महिन्यापूर्वी १६० रुपये किलाे असणारे बेसन आता १०० रुपये किलाेपर्यंत उतरले अाहे.