आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीमुळे पर्यटक खुश टूर ऑपरेटरचा ताण वाढला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच जीएसटीमुळे पॅकेज टूरसाठी पूर्वी लागणारे टक्के शुल्क टक्क्यांवर आल्याने पर्यटकांची चांदी झाली आहे. तर आरसीएमच्या नियमामुळे जीएसटीसाठी नोंदणीकृत नसणाऱ्या स्टेक होल्डर्सचे शुल्क भरताना टूर आॅपरेटर्सना नाकी नऊ येत आहे. दरम्यान, जीएसटी लागू झाल्यानंतरचा शहरातील पहिला पर्यटनाचा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होत असून, पर्यटन व्यावसायिकांच्या याकडे नजरा लागल्या आहेत. 

शहरात काही पर्यटक ग्रुपमध्ये तर काही वैयक्तिक, कुटुंबासोबत येतात. हे पर्यटक टूर ऑपरेटर्सकडून शहरात विविध सेवा घेतात. एक-एक सेवा घेताना होणारा त्रास आणि फसवणूक टाळण्यासाठी पर्यटक पॅकेज पसंत करतात. यात गाइड, टॅक्सी, हॉटेल, जेवण आणि पर्यटन स्थळावरील तिकिटांचा समावेश असतो. जीएसटीपूर्वी टूर ऑपरेटर या पॅकेजवर टक्के सेवाकर आकारत होते. मात्र, जीएसटीमध्ये यात टक्क्यांची कपात झाली आहे. यामुळे पूर्वी महागात मिळणारे पॅकेज टूर स्वस्त झाले आहे. 

टूर स्वस्त झाले असले तरी टूर ऑपरेटर्सची डोकेदुखी वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे जीएसटीच्या नियमाप्रमाणे २० लाखांच्या आत उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांना जीएसटी नोंदणीची गरज पडत नाही. मात्र, ही सेवा घेणाऱ्या टूर ऑपरेटर्सना हा कर अदा करावा लागतो. यास रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजेच आरसीएम असे म्हणतात. या महिन्यात आरसीएमअंतर्गत जीएसटी जमा करावा लागतो. पुढील महिन्यात ही रक्कम परत मिळते. टूर ऑपरेटर्सकडे गाइड, ट्रान्सपोर्ट आदी २० लाखांहून कमी उलाढाल असणारे व्यावसायिक आहेत. त्यांची सेवा घेण्यासाठी टूर आॅपरेटरना आरसीएम जमा करावा लागत असल्याचे औरंगाबाद टुरिझम प्रमोटर्स गिल्डचे अध्यक्ष जसवंतसिंग राजपूत यांनी सांगितले. 

फारसा फरक नाही
दरम्यान, जागतिक वारसा स्थळावर पर्यटकांच्या संख्येत फरक पडला नसल्याचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. आपल्याकडील हॉटेलची बुकिंगही नियमित होती, असे अजिंठ्यातील एमटीडीसी हॉटेलचे सूत्र म्हणाले. उन्हाळ्यात औरंगाबाद आणि परिसरातील पर्यटन कमीच असते. दरम्यान, हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागून असल्याचे जसवंतसिंग म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...