आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीत घडले दि ग्रेट इंडियन थिकनी या गुजराती पाहुण्याने दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जायकवाडी जलाशयाच्या पाणथळीवर रविवारी पक्ष्यांची गणना करण्यासाठी पोहाेचलेल्या पक्षिमित्रांना येथे पहिल्यांदाच दि ग्रेट इंडियन थिकनी या गुजराती पाहुण्याने दर्शन दिले. तर काही वर्षांच्या खंडानंतर परतलेले पिकवीक आणि कवड्या टिलवा हे जुने पक्षीही दिसले. जलाशयावर फ्लेमिंगोसह एकूणच पक्ष्यांची संख्या वाढली असून आठवडाभरात याबाबतची अंतिम आकडेवारी समोर येईल.
 
वन्यजीव खाते, सृष्टी संवर्धन सेवाभावी संस्था आणि पैठण पक्षिमित्र संघटनेच्या वतीने रविवारी (१३ फेब्रुवारी) जायकवाडीच्या पाणथळीत आढळणाऱ्या पक्ष्यांची दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील गणना करण्यात आली. विभागीय वनाधिकारी कमलाकर धामगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपवनसंरक्षक ए.व्ही.बेडके, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे, पक्षिमित्र डॉ. दिलीप यार्दी, सृष्टी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष पक्षिमित्र डॉ. किशोर पाठक, पक्षिमित्र दिलीप भगत, वनपरिमंडळ अधिकारी बी.के. परदेशी, पैठणचे वनरक्षक नीलेश श्रीधर चक्रे, सुरैया शेख, गणेश आखाडे, पी.एम. द्वारकुंडे, के.आर. राठोड यांनी पक्षी गणनेत सहभाग नोंदवला. उर्वरितपान 

ग्रेट इंडियन थिकनी (पिकवीक) 
ग्रेट इंडियन थिकनी मूळ गुजरातचा आहे. सोनेवाडी पॉइंटवर एकाच वेळेस दोन ग्रेट थिकनीचे दर्शन झाले. याचा रंग गाळपेऱ्याच्या रंगाशी तत्काळ जुळून येतो. पाण्यात जाता गाळपेऱ्याच्या मातीतील कीटक, छोटे जलचर याचे खाद्य आहेत. वर्षांपूर्वी बदनापूरजवळील सोमठाणा तलावात तो दिसला होता.
 
संडरलाइन (कवड्या टिलवा) 
संडरलिंग मूळ उत्तराखंड आणि युरोपियन देशांमध्ये आढळतात. उथळ पाणकीटक हे याचे खाद्य आहे. पिंपळवाडी पंपिंग स्टेशनजवळ रविवारी १३ ते १५ संडरलाइन पक्षी दिसले. वर्षांपूर्वी जायकवाडीच्या पाणथळीत हा पक्षी आढळला होता. 

डॅन्लीन (जलरंक) 
डॅन्लीनसुद्धा युरोपीय देशातील पक्षी आहे. किडे, पान हे त्याचे मुख्य खाद्य. वर्षांच्या खंडानंतर त्याचे जायकवाडीत दर्शन झाले आहे. पिंपळवाडी पंपिंग स्टेशनजवळ याच्या तीन जोड्या आढळल्या. 
बातम्या आणखी आहेत...