आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा जेसीबी मशीन लावून हर्सूल तलावातील गाळ काढा, विभागीय आयुक्तांचा महापालिकेला आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तत्काळ दहा जेसीबी मशीन लावा आणि हर्सूल तलावातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर करा, असे स्पष्ट आदेश विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी शनिवारी महापालिकेला दिले. गाळ काढण्यासाठी शासनातर्फे दोन कोटी देण्यात आले आहेत. ते आधी खर्च करा. गरज पडल्यास आणखी निधी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

जुन्या औरंगाबाद शहरातील किमान दहा वसाहतींना पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेल्या हर्सूल तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ आहे. तो काढल्यास आणखी पाच वसाहतींची तहान भागू शकते. शासनाने त्याकरिता वर्षभरापूर्वी दोन कोटी रुपयेही दिले होते. मात्र, मनपाने नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले. याविषयीचे वृत्त "दिव्य मराठी'ने प्रसिद्ध करून सातत्याने पाठपुरावा केल्यावर यंत्रणा हलली. तीन दिवसांपूर्वी गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ महापौर त्र्यंबक तुपे यांच्या हस्ते झाला. खरे तर हाती असलेले दिवस लक्षात घेता मनपाने मोठी मोहीम हाती घेणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात फक्त एकच जेसीबी लावण्यात आला. शिवाय निधीची कमतरता असल्याची ओरडही सुरू केली. त्याचेही वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले. त्याची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली. त्यांनी शनिवारी मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांना बोलावून घेतले.

त्याचवेळी सांगितले होते!
गाळकाढण्याकडे मनपा गांभीर्याने पाहत नसल्याचे निरीक्षण डॉ. दांगट यांनी नोंदवले. एकाच जेसीबी मशीनने गाळ का काढला जात आहे, अशी कडक शब्दांत विचारणा केली. एप्रिलच्या अखेरीस मी आणि मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरियांनी तलावाची पाहणी केली होती. त्याच वेळी दहा जेसीबी उर्वरित.पान

गाळ काढण्याच्या कामाचे व्हिडिओ शूटिंग
गेल्यातीन दिवसांत ३८० ट्रक गाळ काढण्यात आल्याची माहिती मनपातर्फे देण्यात आली. पहिल्या दिवशी ५०, दुसऱ्या दिवशी ८०, तर तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी २५० ट्रक गाळ निघाला. पहिले दोन दिवस तलावात ट्रक फसत होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी स्वत:हून ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे. ट्रॅक्टर, ट्रकवर व्हिडिओ शूटिंगद्वारे नजर ठेवली जात असून देखरेखीसाठी एका अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...