आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादकतेत वाढ : दोन वर्षांत 5 लाख शेतकऱ्यांना शेतजमिनीचे हेल्थ कार्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
औरंगाबाद - जिल्ह्यात माती परीक्षण अभियान प्रभावीपणे राबवून गतवर्षी तीन लाख ५५ हजार ८९५ शेतकऱ्यांना शेतजमिनीचे हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले. यंदा लाख ७० हजार १०५ शेतकऱ्यांना हेल्थ कार्ड वाटप केले जात आहे. एकूण दोन वर्षांत पाच लाख २६ हजार शेतकऱ्यांना हे कार्ड मिळणार आहे. हेल्थ कार्डमुळे जमिनीचा पोत ओळखून पिकांची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
 
जमिनीचा पोत ओळखून कोणती पिके घेणे अधिक फायदेशीर ठरेल, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य आहे की नाही, हे जाणून घेत शेतकऱ्यांनी पिकांची निवड करणे आवश्यक ठरते. 
परंतु, याकडे दुर्लक्ष करत भरघोस उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांत स्पर्धा लागते. त्यासाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर होतो. परिणामी जमिनीचा सेंद्रिय कर्ब ८० टक्क्यांपर्यंत खालावला आहे. नापिकीचा धोका वाढला असून उत्पादनात घट येत असल्याने तोट्याच्या शेतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे अतिरिक्त खतांचा वापर करून विषयुक्त अन्नधान्य निर्मिती होत आहे. यापासून आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. यात सुधारणा करण्यासाठी शेतजमिनीचे माती परीक्षण करून हेल्थ कार्ड वाटप करण्यात येत आहेत. 
 
पाणीही तपासा 
पाण्याअभावी तसेच पाण्याच्या अतिवापरामुळेही नुकसान होते. जमिनीचा पोत ओळखून पिकांची निवड करतानाच पाण्याबाबतही शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शेतात पाणी तुंबून राहणार नाही याची काळजी घ्यावी. उतारास आडवे चर करून पाणी बाहेर काढावे किंवा योग्य ठिकाणी व्यवस्थापन करावे. सुपीकतेनुसार पिकांचे नियोजन करावे. क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनीचा पोत खराब होतो. त्यामुळे पाणी तपासणी करून वापर करावा. सेंद्रिय आणि जैविक खताला प्राधान्य देऊन विषमुक्त अन्न निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला आवाहन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. 
 
एकल पीक पद्धत टाळा 
मातीचेकण, हवेचे प्रमाण, ओलावा टिकून राहावा, पीएचचे प्रमाण संतुलित राहावे, यासह सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा समतोल वापर करावा. सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे. एकल पीक पद्धत टाळावी उलटून पालटून पिके घ्यावीत, असा सल्ला शेतीतज्ज्ञांनी दिला आहे. 
 
5 लाख शेतकऱ्यांना लाभ 
जिल्हामृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने माती परीक्षण अभियान प्रभावीपणे राबवले असून दोन वर्षांत लाख २६ हजार शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्य पत्रिका वाटप करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...