आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदय प्रत्यारोपण : माझे कुंकू पुसले, पण चार जणींचे उजळल्याचे समाधान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काळापुढे कोणाचेच काही चालत नाही. त्यामुळे जे घडले त्याचा स्वीकार केला आहे. त्या अपघातात माझे कुंकू पुसले गेले. पण चार जणींचे उजळले, याचे समाधान आहे, असे ज्योती पाटील यांनी भावपूर्ण शब्दांत सांगितले. त्यांचे पती अनिल पाटील यांचे ब्रेनडेड झाले. त्यानंतर त्यांचे हृदय, यकृत आणि दोन किडन्या चार जणांना देण्यात आल्या. युनायटेड सिग्मा रुग्णालयात बुधवारी हृदय प्रत्यारोपण झाले. ़
 
पतीच्या अकाली जाण्याचा आघात सहन करत ज्योती पाटील यांनी अवयवदानाची तयारी दाखवली. या संदर्भात त्या म्हणाल्या की, माझ्या पतीच्या प्रकृतीची पूर्ण कल्पना डॉक्टरांनी मला दिली होती. मला परिस्थितीचा अंदाज आला होता. पाटील यांची मुलगी प्राजक्ता म्हणाली की, जेव्हा डॉक्टरांनी पप्पा ब्रेनडेड असल्याचे सांगितले, तेव्हाच मला पुढे घडणाऱ्या घटनांची चाहूल लागली. अाजोबांना यासाठी मानसिकरीत्या तयार करण्यासाठी आम्ही चर्चा केली. माझे पप्पा गेले, पण इतर मुलांच्या पप्पांना नवे जीवन मिळाले. त्यांच्या रुपात माझे वडिल जिवंत आहेत, अशी माझी भावना आहे. ज्या शेतकऱ्याला अनिल यांचे हृदय मिळाले त्यांच्या पत्नी म्हणाल्या की, माझ्या पतीला काळीज देणारा तर जग सोडून गेला; पण त्याच्या कुटुंबाने घेतलेल्या निर्णयामुळे माझे कुंकू वाचले. देव त्यांना सर्व सुख देवो. 

शहरासाठी महत्त्वाचा क्षण 
हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणारे डॉ. आनंद देवधर म्हणाले की, आतापर्यंत महाराष्ट्रात मुंबईतील फोर्टिस आणि कोकिळाबेन रुग्णालयातच हृदय प्रत्यारोपण होत होते. औरंगाबादेत आज पहिले हृदय प्रत्यारोपण यशस्वी झाले, याचा आनंद आहे. गेल्या वर्षी १६ जानेवारीला एअर अँब्युलन्स वेळेत मिळाल्याने राम मगरचे हृदय कुणालाही देता तसेच सोडावे लागले होते. त्याची वाटणारी खंत आज काही प्रमाणात कमी झाली.  
 
ही डॉक्टरांची टीम : डॉ.उन्मेष टाकळकर यांच्या नेतृत्वात डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ. दीपक बोर्डे, डॉ. सुजित खाडे, डॉ. अरुण चिंचोले, डॉ. अभय महाजन, डॉ. सचिन सोनी, डॉ. विजय दौंडे, डॉ. गणेश बर्नेला, डॉ. मनीषा टाकळकर, डॉ. बालाजी अपसिंगेकर, डॉ. शिरीष देशमुख, डॉ. आशिष देशपांडे यांनी प्रत्यारोपण केले. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, पाटील कुटुंबामुळे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...