वेरुळ - खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी गावात काल (सोमवारी) रात्री 7 वाजेनंतर जोरदार वादळाचा तड़ाखा बसला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झाले आहे. सोलापूर-धुळे महामार्गावरील वेरुळ ते पळसवाडी या दोन किमीच्या अंतरात साधारण तीसहून अधिक झाड़े उन्मळून पडले आहे.
या तडख्यामध्ये एक झाड हॉटेलवर पडले होते. यामध्ये हॉटेल चालक अमोल म्हसरूपसह दहा ते बारा गावकरी थोडक्यात बचावले आहे. अनेक घरावरील पत्रे उडून गेले. वादळाच्या तडाख्यात सात विजेचे पोल पडल्याने पळसवाडी गावात रात्री पासून लाईट नाही गेली आहे. रात्री आठच्या सुमारास सोलापूर धुळे महामार्गावर बाभळीचे झाड़ पडल्याने तासभर वाहतूक बंद होती. यामुळे वाहानांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
पंचायत समिती सदस्य युवराज ठेंगड़े यांच्यासह ग्रामस्थानी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता वहातुकीस मोकळा केला होता. यावेळी महामार्ग पोलीसासह खुलताबाद पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांच्याही पथकांची उपस्थिती लावली होती. तातडीने या नुकसानीचा पंचनामा करण्यात येईल असे खुलताबाद तहसीलदार डॉ. अरुण जरहाड़ यांनी दै. दिव्यमराठीशी बोलताना सांगितले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा फोटो आणि व्हिडिओ..