आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेट नसेल तर ~ 500 दंड, 15 जानेवारीनंतर अधिक दंड मोजावा लागण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना १५ जानेवारीनंतर अधिक दंड मोजावा लागण्याची शक्यता आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पाचशे रुपयांपर्यंत, तर सिग्नल तोडणे, राँग साइड गाडी चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे या कारणांसाठीही दंडाची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिस उपायुक्त संदीप आटोळे यांना विचारले असता ते म्हणाले की, शासनाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल. दंड वसुलीसाठी पीओएस मशीनही मागवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. वाढीव दंडाचा निर्णय अंमलात आणण्यापूर्वी जनतेला त्याची कल्पना देण्यात येईल. दंडाची रक्कम वाढवणे हा शासनाचा निर्णय असून वरिष्ठांच्या आदेशानंतर कारवार्इ सुरू केली जाईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त चंपालाल शेवगण यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...