Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» News About Hindu Code Bill India Women Boon

हिंदू कोड बिल हे भारतीय स्त्रियांसाठी वरदान: डॉ. वाल्मीक सराेदे

डीबीस्टार | Apr 21, 2017, 07:15 AM IST

  • हिंदू कोड बिल हे भारतीय स्त्रियांसाठी वरदान: डॉ. वाल्मीक सराेदे
औरंगाबाद- १९४७ पासून सतत वर्षे महिना २६ दिवस बाबासाहेबांनी अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले. स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पाहिले. हिंदू कोड बिल हे भारतीय स्त्रियांसाठी वरदान आहे, पण भारतीय स्त्रिया ते समजू शकल्या नाहीत, अशी खंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. वाल्मीक सराेदे यांनी व्यक्त केली.
साकेतनगरमधील त्रिरत्न चौकात आदर्श बौद्ध उपासक विचार मंचाच्या वतीने भीमजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शंकर अंभोरे तसेच विचारमंचावर रामेश्वर तागडे, राजकन्या गोडाणे, प्रा. देवानंद वानखेडे होते.
ते पुढे म्हणाले की, १९४४-४५ मध्ये डॉ. बाबासाहेबांनी नद्या जोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. डॉ. बाबासाहेब उत्कृष्ट जलतज्ज्ञ होते. त्यांचे विचार आम्ही अंमलात आणले असते तर आज या या देशावर जलसंकट आले नसते.

त्रिरत्न चौक ही आपणासाठी क्रांतिकारी भूमी आहे ही भूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजाच्या म्हणजे धम्मसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुणित झालेली भूमी आहे, त्या मुळे यापुढील क्रांतीच्या मशाली याच चौकामधून पेटवल्या जातील असा आशावाद रमेश खोब्रागडे यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये केला. तसेच या वेळी सिद्धार्थ महेंद्र कदम याची अॅरोबिक्समध्ये आंतरराष्ट्रीय पंच म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात साकेतनगर परिसरातील उपासक, उपासिका, प्राचार्य मदन साबळे, अॅड. महेंद्र कदम, शिवाजी मिसाळ, डॉ. इंगळे, अशोक वाढई, रामदास निरंजने, अॅड. कंकाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलिस रामटेके यांनी केले.

Next Article

Recommended