आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचा ऐतिहासिक खजिना, मध्ययुगीन काळातील अडकित्ते, ईस्ट इंडिया कुलूप, जुनी नाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक जिल्ह्यातील नगररचना विभागातील अधिकारी अनंत धामणे यांनी एक आगळावेगळा छंद जोपासला आहे. त्यांच्या संग्रहात ९० प्रकारचे अडकित्ते, ७२ प्रकारची भव्य लोखंडी कुलुपे, २२ प्रकारचे पानपुडे, १८ प्रकारचे दौत, टाक आहेत.

धामणे हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या आजी पुतळाबाई यांच्या निधनानंतर त्यांनी जपून ठेवलेल्या काही वस्तू धामणे यांना मिळाल्या. यात चांदीचा करंडा लक्षवेधी आहे. मुलांच्या खेळण्याच्या गोट्या, भवरे आदी वस्तू त्यांच्याकडे आहेत. त्यावेळी धामणे अवघ्या पंधरा वर्षांचे असताना अशा वस्तुंकडे पाहून त्यांना विशिष्ट आकर्षण निर्माण झाले. 

जुन्यावस्तूंचे आकर्षण 
धामणेयांनी चाळीसगाव येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे अमरावती येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. पुढे नगररचना विभागात नोकरीला लागले. याचकाळात त्यांनी नाणी संग्रह करण्यास सुरुवात केली. या विशिष्ट संस्थानिकांची नाणी संग्रहित करताना त्यांना ऐतिहासिक काळातील कुलुपे, पानडब्बे अशा जुन्या वस्तुंचा संग्रह करण्याचा छंद लागला अन् तेव्हापासून त्यांच्याकडे विशिष्ट प्रकारचा संग्रह निर्माण झाला. 

शिवकालीन नाणी 
नाशिकमध्येनगररचना विभागात अधिकारीपदावर असतानाही आपल्या नोकरीतून वेळ काढून ते छंद जोपासत आहेत. त्यांच्याकडे मुगल कालीन तांबे, सोने, चांदीची चारशेहून अधिक नाणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची अडीचशेहून अधिक शिवराई नाणीही त्यांनी जपून ठेवली आहे. १८३५ ते २०१६ पर्यंतच्या काळखंडातील विविध नाण्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. याबरोबरच त्यांच्या संग्रहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे ९० प्रकारचे अडकित्ते, ७२ प्रकारची लोखंडी कुलुपे, २२ प्रकारचे पानपुडे, १८ प्रकारचे दौत, टाक आहेत.
 
पानपुडे, लिहिण्याचा टाक, नक्षीदार अडकित्ते  
मुगलकाळातपान ठेवण्यासाठी दरबारी पानाचे डबे म्हणजेच पानपुडे ठेवल्या जात होते. असे अनेक पानडबे धामणे यांच्या संग्रही आहेत. संग्रहित वस्तूंमध्ये नक्षीकाम केलेले चांदी, तांबे, पितळी पानपुडे बघण्यास मिळतात. कोंबडा, मोर, बदक आणि नक्षीकाम केलेले जाळीदार पानपुडेदेखील आहेत. अशा ७२ प्रकारचे पानपुडे आहेत. जुन्या काळात लिखाणासाठी दौत शाईचा वापर केला जात होता. त्यासोबतच पेन म्हणून टाकचा नेहमी वापर होत होता. पत्रलेखन, आदेश लिहिण्यासाठी टाकचा उपयोग होत होता. जीपच्या आकारातील पानपुडादेखील आहे. धामणे यांच्याकडे विशिष्ट १८ प्रकारचे दौतच्या बाटल्या आणि टाक सांभाळून ठेवल्या आहेत.या वस्तू पाहण्यासाठी लोक येत असतात. 

ईस्ट इंडिया लिहिलेले कुलूप 
धामणे यांचे आजोबा सावकार होते. त्यांचा मोठा वाडासुद्धा होता. जुन्या काळात वाड्यांना लावण्याचे विशिष्ट प्रकारचे लोखंडी कुलूप त्या काळी मिळत होते. संग्रहित असलेल्या कुलुपांमध्ये सर्वात मोठे कूलूप किलो वजनाचे बघण्यास मिळतात. एका कुलुपावर १८७७ वर्ष आणि ईस्ट इंडिया असे नाव त्यावर लिहिले आहे. त्याचप्रमाणे लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंतचे कुलूपही त्यांच्याकडे बघण्यास मिळतात. विशेष म्हणजे विविध आकारातील ही कुलुपे संग्रहात लक्ष वेधून घेणारे आहेत. 

छोटे म्युझियम बनवणार 
धुळे,नंदुरबार,नाशिक आदी ठिकाणी प्रदर्शन भरवले आहेत. या वस्तूंचा संग्रह करण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात पर्यटनासाठी गेल्यानंतर संग्रहित केल्या आहेत. घरी छोटेखानी म्युझियम तयार करण्याचा मानस आहे.यामुळे नवीन पिढीला माहिती होईल. 
-  अनंत धामणे

अनंतधामणे, संग्राहक
मुघल काळात पान खाण्याची खास शैली असल्यामुळे त्याकाळात सुपारी फोडण्यासाठी खास अडकित्ते तयार करण्यात आले होते. ज्यामध्ये लोखंडी, पितळी आणि चांदीचे अडकित्ते होते. दीडशे वर्षांपूर्वीच राजा-राणी लिहिलेले अडकित्ते त्यांच्याकडे आहेत. या अडकित्त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे याला घुंगरू लावण्यात आलेले होते. अडकित्त्यांमध्ये प्राण्यांच्या -पक्ष्यांच्या विविध आकाराचे अडकित्ते आहेत. प्रेमभाव दाखवणारी चिन्हे असलेली अडकित्ते आहेत. काही अडकित्त्यांमध्ये शस्त्रदेखील दाखवले आहे. हे अडकित्ते जळगाव, धुळे, श्रीरामपूर, परभणी, नाशिक आदी ठिकाणावरून मिळवले आहेत. 

तुमच्याकडेही आहे का दुिर्मळ वा आगळ्यावेगळ्या गोष्टींचा खजिना, विदेशवारीचा वेगळा अनुभव, तुम्हीही जपलाय का पिढ्यान्पिढ्यांच्या व्यवसायाचा वारसा, तुमच्याकडेही आहे का संयुक्त कुटुंबाचा गुलदस्ता, कुणी घेतली असेल प्रतिकूल परिस्थितीतून भरारी, केली असतील पूर्ण वैवािहक जीवनाची ५० वर्षे िकंवा असेल तुमच्याकडे लाखात एखादी वस्तू, तर ९०४९०६७८८८ या मोबाइलवर संपर्क साधा िकंवा ई-मेल करा. editor.dbstar@dbcorp.in 
 
पुढील स्लाइडवर पाहा संग्रहालयातील ऐतिहासीक फोटोज्...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...