आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाेळी विशेष: ममदापुरात रुजतेय ‘एक गाव एक हाेळी’, पर्यावरण रक्षणासाठी उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
बीड - ‘मिळून सारे करू साजरी, एक गाव एक हाेळी, विसरून जाऊ भेद जुने ती रंगात रंगू नरनारी’ असा संदेश देत हाेळीच्या सणाला अालेले विकृत स्वरूप अाणि त्यातून हाेणारी पर्यावरणाची हानी राेखण्यासाठी ‘एक गाव एक हाेळी’ ही संकल्पना पुढे करत यंदाही अंबाजाेगाई तालुक्यातील ममदापूर येथे लहान थाेरांसह महिलांचा सहभाग वाढविणारी  हाेळी साजरी करण्यात येणार अाहे.  तीस वर्षांपासून वृक्ष संवर्धनासाठी झगडणारे वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी या हाेळीसाठी पुढाकार घेतला असून परिसरातील १८ बचत गटांचे त्यांना पाठबळ मिळत अाहे.   

हाेळी म्हटले की नकाे त्या शिव्या, अाराेळ्या, बाेंबलण्याचा प्रघात वाढला अाहे. माेठ्या प्रमाणात वृक्षताेड अाणि  नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान लाकडे पेटवून हाेत अाहे. संस्कृतीकडून विकृतीकडे वाटचाल करणारा हा प्रकार राेखण्यासाठी एक गाव एक गणपती प्रमाणे हाेळीचा सणही असाच साजरा  करण्याची कल्पना वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी मागील वर्षी  सुचविली. या अागळ्यावेगळ्या हाेळीसाठी गावातील पाचवी ते दहावीच्या मुला- मुलींचा सहभाग वाढविला. 
 
भजनी मंडळाने पर्यावरणाचा संदेश देणारे अभंग व भजन गायिले, मुला- मुलींनी वंदे मातरम, भारतमाता की जय, हम सब एक है या घाेषणा देत लहान अाकाराच्या हाेळीला प्रदक्षिणा घालून सण साजरा केला. विशेष म्हणजे हाेळीच्या पुजनात महिलाही सहभागी हाेत्या. या वर्षीही संस्कृती व पर्यावरण जपणारी अशीच हाेळी करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 
धार्मिकतेतून निसर्ग संवर्धनाकडे वाटचाल करण्याचा संदेश देण्यासाठी ममदापूरवासीय सरसावले अाहेत. त्यांच्या या प्रयत्नांना सार्वजनिक स्वरूपात प्रतिसाद मिळाला  तर पर्यावरण रक्षणासाठी मैलाचा दगड ठरू शकताे.  
 
साेन्याचा काेळसा करू नका : अाधीच पशुधन कमी हाेत चालले अाहे. गाेवऱ्या शिल्लक नाहीत. पाेत्यानिशी वाटाेळे हाेत अाहे. प्रदूषण वाढत अाहे. साेन्याचा काेळसा करू नका, हाेळीला कमी संख्येने गाेवऱ्यांचा वापर करून त्यांचा खतासाठी वापर केला तर जमिनीचे साेने हाेईल, असे अावाहन सुधाकर देशमुख यांनी केले.   
 
बचत गट सक्रिय  
सुधाकर यांच्या पत्नी माेहिनी देशमुख या बचत गटात कार्यरत अाहेत. वटवृक्ष बचत गटासह १८ बचत गटांतील महिलांचे सहकार्य मिळाले. या वर्षी अाठ मार्च राेजी बचत गटांच्या महिलांच्या उपस्थितीमुळे चाळीस वर्षांमध्ये बहुधा पहिली ग्रामसभा झाली. सामाजिक उपक्रमात महिलांचा सहभाग वाढत अाहे.   
 
शिवजयंतीपासून केले प्रबाेधन   
वृक्ष संवर्धनासाठी जनजागृतीचे कार्यक्रम सुधाकर देशमुख राबवतात. शिवजयंतीनिमित्त श्रीपतराय वाडी, कळंबअंबा, नांदडी ममदापूर, वांगी, बाेरी सावरगाव, काेथळा यादी पंधरा गावांतील कार्यक्रमामध्ये व्याख्यान आणि पाेवाड्यातून लहान हाेळी, एक गाव एक हाेळी साजरी करण्यासाठी त्यांनी प्रबाेधन केले.   
 
एका गावात एक टन लाकडाची हाेळी  
- जंगल क्षेत्र दाेन टक्क्यांवर अाले अाहे. हाेळीच्या वेळी एका गावातील एक टन सरपण जाळले जाते.  पाच ते दहा झाडांचा यात बळी जाताे. जिल्ह्यात १९०० खेडे व शहरे अाहेत त्यामुळे पर्यावरणाची हानी हाेते. हेच गणित महाराष्ट्राचे लावले तर किती नुकसान हाेत असेल?   नैसर्गिक महत्त्व टिकविण्यासाठीच एक गाव एक हाेळी हा उपक्रम  सुरू केला अाहे. 
 सुधाकर देशमुख, वृक्षमित्र.   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...