आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद- घरच्या घरी इन्स्टंट इडली, आप्पे आणि ढोकळे बनवण्याच्या टिप्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महसूल प्रबोधिनी सभागृहात आयोजित प्रशिक्षणात प्रात्याक्षिक दाखवताना मंगला चंडालिया. - Divya Marathi
महसूल प्रबोधिनी सभागृहात आयोजित प्रशिक्षणात प्रात्याक्षिक दाखवताना मंगला चंडालिया.
औरंगाबाद- धावपळीच्या जीवन शैलीत झटपट बनणाऱ्या पदार्थांना विशेष महत्त्व आले आहे. त्यामुळेच प्रिझर्व्हेटिव्ह घातलेल्या रेडी टू इट पदार्थांची मागणी वाढली. मात्र, यासोबत आजारांना निमंत्रणही मिळत आहे. यासाठी संगिनी महिला मंडळातर्फे इन्स्टंट पदार्थ कसे बनवायचे यासाठी गुरुवार, १३ एप्रिल रोजी महसूल प्रबोधिनी सभागृहात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंगला चंडालिया यांनी इडली, डोसा, रेशम ढोकळा, अाप्पे हे पदार्थ तत्काळ कसे बनवता येतील याचे प्रात्यक्षिक दाखवले. 
 
घरातील पदार्थांचा वापर करून इडली, आप्पे, ढोकळा बनवणे प्रत्येकीला समाधान देणारे आहे. या दृष्टीने संगिनीचे हे प्रशिक्षण विशेष ठरले. या वेळी ढोकळा, मेदुवडा, गुलाबजाम, जिलेबी, मुगाच्या शिऱ्यापासून पुरणपोळीपर्यंत वैविध्यपूर्ण ३० पदार्थांचे प्रशिक्षण या वेळी देण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षा रूपाली भंडारी, विद्या कटके, रश्मी शहा आणि इतर कार्यकारिणीची या वेळी उपस्थिती होती. 
 
 
 
असे बनवा झटपट पदार्थ 
इडली : कोरडे १ कप तांदूळ, १/३ कप उडद दाळ, १/४ सायट्रिक अॅसिड, मीठ आणि साखर १-१ चमचा या सर्व वस्तू मिक्सरवर दळून घ्या. ताकामध्ये थोडावेळ भिजवा. इडली बनवताना सोडा टाकून पात्रात इडली लावा. 
 
मूगदाळ हलवा : १ कप बेसन, कप मुगाच्या डाळीचे पीठ, चमचे साजूक तूप आणि चमचे पाणी टाकून एकत्र करा. अर्धा कप तुपात हे मिश्रण चांगले भाजा. कप गरम पाणी टाका. ते कप साखर, विलायची टाकून शिजू द्या. 
 
काळानुरूप प्रयोजन 
-काळानुरूप कार्यक्रमांचे आयोजन करणे उपयुक्त ठरते. संगिनीच्या माध्यमातून गृहिणींचे जीवन अधिक सुखकर आणि उत्तम व्हावे यादृष्टीने आम्ही सातत्याने कार्यक्रमांची आखणी करतो. त्याचा सर्वांना फायदा होतो. -रूपाली भंडारी, अध्यक्षा 
बातम्या आणखी आहेत...