आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडा भुर्जी का केली नाही म्हणत पत्नीला जाळले, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद  - अंड्याची भुर्जी का बनवली नाही म्हणून एकाने पत्नीस जाळल्याची घटना दि. २७ रोजी गोळेगाव येथे घडली होती. याप्रकरणी पत्नीचा उपचारादरम्यान औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला असून पतीस अटक करण्यात आली आहे.   
 
तालुक्यातील गोळेगाव येथील जनार्दन लक्ष्मण गोल्हार हा वाहनचालक अाहे. जनार्दन हा २७ एप्रिल रोजी दुपारी मद्य प्राशन करून नशेत घरी आला. त्यापूर्वी त्याने पत्नी पर्वताबाईला अंडा भुर्जी बनवण्यास सांगितले होते. घरी आल्यावर भुर्जी तयार नसल्याने जर्नादन पत्नीवर संतापला. तू अंड्याची भुर्जी का बनवली नाही म्हणत त्याने पत्नीला मारहाण करत शिवीगाळ केली व अंगावर रॉकेल ओतून पत्नी पर्वताबाईला पेटवले. ही घटना दि. २७ रोजी घडली होती. पर्वताबाईला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान दि. २ रोजी तिचा मृत्यू झाला. मृत्युपूर्वी पर्वताबाईने पोलिसांना जबाब दिला होता. याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात आरोपी जनार्दनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार बेंद्रे, पोलिस हे.काॅ. गणेश काथार पुढील तपास करत आहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...