आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत चोरट्यांचे पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- उन्हाळ्याच्या सुट्या लागताच चोरट्यांनी बंद घरांवर लक्ष ठेवत घरफोड्या करण्यास सुरुवात केली आहे. मुकुंदवाडी, सिडको, सातारा परिसरासह जुन्या शहरात घरात चार्जिंगला लावलेले मोबाइल, घरासमोर लावलेली दुचाकी पळवण्याचेही प्रकार वाढले आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांचा हा उच्छाद सुरूच आहे. गुन्हे शाखाही चोरट्यांना गजाआड करण्यात अपयशी ठरली. 
 
घटना क्रमांक 1 : मुकुंदवाडीपरिसरातील सिद्धेश्वर सुखदेव गायकवाड हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे कुटुंबीय घराचा दरवाजा उघडा ठेवून बाहेर झोपलेले असताना शुक्रवारी पहाटे ला अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि दोन हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला. मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक राहुल खटावकर तपास करत आहेत. 
 
घटना क्रमांक 2 :मुकुंदवाडीतील संघर्षनगरातील सिद्धेश्वर बाभळे हे दरवाजा उघडा ठेवून झोपले असता अज्ञात चोरट्याने १२ हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला. मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तपास हवालदार देशमुख करत आहेत. 
 
घटना क्रमांक 3 :हर्सूल भागातील फातेमानगरात राहणाऱ्या शेख इक्बाल शेख इस्माईल यांचा सहा लाख रुपयांचा ट्रक (एमएच २० डीई ३४६०) चोरीला गेल्याचा प्रकार मे रोजी रात्री घडला. हर्सूल ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार शिंदे करत आहेत.
 
घटना क्रमांक 4 :मध्यवर्तीबसस्थानकावर प्रगती प्रदीप गंगवाल यांचा ११ हजार ८५० रुपयांचा मोबाइल चोरट्याने लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. गंगवाल या कन्नडला जाण्यासाठी बसस्थानकावर आल्या होत्या. क्रांती चौक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास हवालदार आगळे करत आहेत. 
 
घटना क्रमांक 5 : सूतगिरणी चौकातील विभागीय क्रीडा संकुल येथून नितीन मनीष लांजेकर (रा. प्रकाशनगर) यांचा दहा हजार रुपयांचा मोबाइल गुरुवारी चोरीला गेला. जवाहरनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस नाईक परदेशी करत आहेत. 
 
सातारा परिसरातून लाखाचा एेवज लंपास 
सातारा परिसरातील अालोकनगर भागात राहणाऱ्या वैभव भास्करराव कोलते यांच्या घरातून एक लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल मे रोजी चोरट्यांनी लंपास केला. यात ४० हजार रुपये रोख होते. कोलते हे घराला कुलूप लावून कामासाठी गेले असता चोरट्यांनी पाठीमागच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. स्वयंपाकघरातील सामान अस्ताव्यस्त करून ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपये रोख चोरले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक बहुरे करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...