आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारांची किती काळजी? तुरुंगात मारताहेत पनीर अन् चिकनवर ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाइल फोटो - Divya Marathi
प्रोफाइल फोटो
औरंगाबाद - सकाळची सुरुवात दूध, ब्रेड आणि अंड्यांसह. जेवणात ताज्या हिरव्या भाज्या. रात्री झोपण्याआधी कधी खीर, कधी मिठाई. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांच्या देखरेखीखाली स्वत:च्या हाताने बनवलेले जेवण. हा आहार चांगल्या वसतिगृहातील किंवा जिमला जाणाऱ्या तरुणांचा नाही, तर जे सध्या देशातील तुरुंगात बंद आहेत, त्या गुन्हेगारांचा आहे. सध्या देशाच्या सीमेवर तैनात जवान जेवणाच्या गुणवत्तेबद्दल चिंतित असताना या विषयावर देशात व्यापक चर्चा/चौकशी होत आहे. त्या अनुषंगाने ‘भास्कर’ने तिहार तुरुंग आणि विविध राज्यांतील केंद्रीय तुरुंगांत कैद्यांना कसे जेवण दिले जात आहे याची माहिती घेतली. तुरुंगातील कैद्यांना सामान्य नागरिकांपेक्षा चांगले जेवण मिळते, असे त्यात आढळले. तिहार तुरुंगाचे एआयजी मुकेश प्रसाद  यांनी सांगितले की, आम्ही नेहमीच तुरुंग नियमावलीनुसार कैद्यांना जेवण देतो. तिहारमध्ये कैद्यांना सकाळी चहासोबत चार ब्रेड दिले जातात आणि संध्याकाळी चहासोबत बिस्किटेही. त्यानंतर दुपारी आणि रात्री जेवणात पोळी, भाजी आणि डाळ दिली जाते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुधीर यादव हे नवे महासंचालक म्हणून आल्यानंतर नियंत्रण यंत्रणा आणखी भक्कम होत आहे. अनेकदा ते स्वत: डाळ किंवा भाजीची चव पाहून गुणवत्ता तपासतात. तुरुंग तज्ज्ञ आणि तुरुंगाचे माजी प्रवक्ता सुनील गुप्ता यांनी सांगितले की, सामान्यपणे एक व्यक्ती 
एका दिवसात दीडशे ते दोनशे ग्रॅम पिठाच्या पोळ्या खाते; पण तिहार तुरुंगात प्रत्येक कैद्याला ४०० ग्रॅम पीठ दिले जाते. तिहारमध्ये येणारे सुमारे ६० टक्के कैदी कनिष्ठ-मध्यम श्रेणीतून येतात. त्यामुळे त्यांना येथे पौष्टिक, संपूर्ण आणि सुरक्षित आहार मिळतो असे म्हणता येईल. तो त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. सुमारे १० टक्के कैदी व्यसनाधीन असतात. त्यांच्यावर विशेष देखरेख ठेवली जाते.
 
हरियाणातील मध्यवर्ती तुरुंगात गहू खरेदी समिती आहे. त्यात हॅफेडचे (सहकारी संघ) कर्मचारी, मंडई आणि बाजार समित्यांचे अधिकारी, तुरुंग प्रशासनाचा एक अधिकारी असतो. खरेदी केलेला गहू चांगल्या जागी साठवला जातो. त्याशिवाय डाळ ऑनलाइन टेंडरद्वारे खरेदी केली जाते. तेल, मसाले आणि मीठ हॅफेडकडून मागवले जाते. प्रत्येक तुरुंगात पिठाची गिरणी आहे. बिहारमधील राज्याचा एकमेव ‘आदर्श’ मध्यवर्ती तुरुंग बेऊरमध्ये आहे. तेथे सध्या १५ कैद्यांचे जेवण सकाळ-संध्याकाळ घरून येते.

तुरुंग महानिरीक्षक आनंद किशोर यांनी सांगितले की, तुरुंग नियमावलीनुसार विचाराधीन कैदी (न्यायालयीन कोठडीतील) किंवा उच्च श्रेणीचे कैदी दररोज घरून जेवण मागवू शकतात. येरवडा तुरुंगाचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी सांगितले की, हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुरुंग आहे. राज्यात एकूण २९ हजार ८०६ कैदी आहेत. येरवड्यात ४१२९ कैदी आहेत. तेथे दररोज प्रति कैदी २१६ रुपये खर्च होतो. कैद्याला सकाळी नाष्टा, दिवसात दोनदा चहा, दोन वेळा जेवण दिले जाते. मध्य प्रदेशच्या इंदूर मध्यवर्ती तुरुंगाचे तुरुंगाधिकारी ललित दीक्षित यांनी सांगितले की, मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना आमच्यापेक्षा जास्त चांगले जेवण मिळते. आठवड्यात ५ प्रकारच्या डाळी आणि वेगवेगळ्या भाज्या कैद्यांना दिल्या जातात. कैद्यांचे वजन, आजार आणि त्यांची गरज यानुसार वेगवेगळे जेवण दिले जाते.
 
कैद्यांना आपल्यापेक्षा जास्त जेवण मिळते. वजन आणि आजारानुसार,’ 
- ललित दीक्षित, तुरुंगाधिकारी, सेंट्रल जेल, इंदूर
 
आठवड्यात न्यायाधीश एकदा जेवण तपासतात. महिन्यात एकदा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जेवण तपासतात.’ -वाय. एस. सिंघल, महासंचालक,हरियाणा
 
जवानांपेक्षा जास्त पीठ कैद्यांना
तिहार तुरुंगात प्रत्येक कैद्याला ४०० ग्रॅम पीठ मिळते. बीएसएफच्या जवानांना तेवढेच मिळते. राजस्थानात कैद्यांना ६०० ग्रॅम पीठ मिळते. सामान्य माणूसही दीडशे-दोनशे ग्रॅमच्याच पोळ्या खातो.
 
२५० ग्रॅम भाजी मिळते 
तिहारमध्ये प्रत्येक कैद्यास दररोज २५० ग्रॅम aभाजी मिळते. बीएसएफमध्ये २४० ग्रॅम भाजी मिळते. सामान्य माणूस तर दिवसात दीडशे ग्रॅमच भाजी खातो. पण तुरुंगात पूर्ण आहार मिळतो.
 
कैद्यांना मिळते ९० ग्रॅम वरण तिहारमध्ये ९० ग्रॅम वरण दिले जाते. बीएसएफमध्येही तेवढेच वरण मिळते. अनेक तुरुंगात सात दिवस वेगवेगळे वरण मिळते. सामान्य व्यक्ती एका दिवसात सरासरी ५० ग्रॅमच वरण खाऊ शकते
 
 छोले, मिठाईही मिळते  
तिहारध्ये कैद्यांना आठवड्यात एक दिवस खीर आणि विशेष प्रसंगी छोले-पुरी, मिठाई दिली जाते. हरियाणाच्या तुरुंगात मंगळवारी खीर तयार होते. छत्तीसगडमध्ये रविवारी शिरा बनवतात.
 
सकाळी दूध आणि फुटाणेे 
हरियाणाच्या मध्यवर्ती तुरुंगात सामान्य कैद्यांना सकाळी २५० ग्रॅम दूध आणि १०० ग्रॅम ब्रेड देतात. छत्तीसगडमध्ये रविवारी सकाळी कैद्यांना १०० ग्रॅम फुटाणे दिले जातात.
 
आजारी कैद्यांना ज्यूसही मिळतो
छत्तीसगडमध्ये ६० वर्षांवरील कैद्यांना ५०० ग्रॅम दूध आणि एक अंडे दिले जाते. आजारी कैद्यांना तर ज्यूस आणि इतर पौष्टिक आहारही मिळतो.