आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: माझ्या बदलीचे पत्र अजून मिळाले नाही : पोलिस आयुक्त अमितेश कुमार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बदलीची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत शनिवारी त्यांनाच विचारले असता माझी बदली झाल्याचे कुठलेही पत्र अजून मिळाले नाही. मात्र, माझा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे बदलीचे आदेश येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. 
 
दरम्यान, शहरातील भाजपच्या काही नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिकलठाणा विमानतळावर भेट घेऊन अमितेश कुमार यांची बदली करू नका, अशी विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या पोलिस मुख्यालयाच्या इमारतीचे काम सुरू अाहे. क्रांती चौक येथील जुन्या पोलिस वसाहतीच्या जागी १५ मजली आठ इमारती उभ्या राहणार आहेत. अमितेशकुमार यांनी हे प्रकल्प आणले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात वाढ होण्याची शक्यता आहे. 
बातम्या आणखी आहेत...