आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोडमध्ये सिद्धेश्वर कारखान्याच्या चेअरमनपदी इद्रिस मुलतानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाजपचे  इद्रिस मुलतानी यांची तर व्हाइस चेअरमनपदी गणेश ठाले यांची  बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवारी झालेल्या विशेष सभेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी रशीद शेख यांची उपस्थिती होती.
 
नुकत्याच झालेल्या काखान्याच्या निवडणुकीत भाजपचे पॅनल निवडून आले आहे.  सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाने एकमताने चेअरमन, व्हाइस चेअरमनची निवड केली.    चेअरमन इद्रिस मुलतानी म्हणाले की, कारखाना गेल्या ४ वर्षांपासून सुरू होता, परंतु या वर्षी कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध नसल्यामुळे सुरू होऊ शकला नाही. परंतु नवीन संचालक मंडळाच्या कार्यकाळात आपल्या सर्वांच्या सहकार्याने व खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली  गळीत हंगामात  कारखाना सुरू  होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 
बातम्या आणखी आहेत...