आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’ रात्री गर्भ जाळून कचराकुंडीत फेकत होती; अवैध गर्भपात प्रकरणात धक्कादायक खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिन्सी पोलिस ठाण्यापासून २०० मीटर अंतरावर रणमस्तपुरा येथे अवैध गर्भपात केंद्र चालवणाऱ्या डॉ. चंद्रकला गायकवाडला बुधवारी (२५ मे) पोलिसांनी अटक केली. ती गर्भपात झाल्यानंतर गर्भ जाळून कचराकुंडीत फेकून देत असल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान, शनिवारी न्यायालयाने तिची पोलिस कोठडी दोन दिवसांनी वाढवली. आता जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर आणि त्यांचे पथक गायकवाडचे दलाल कोण असावेत, याचा शोध घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन खोल्यांच्या या केंद्रात दररोज चार ते पाच गर्भपात होत होते. त्यात कुमारी मातांचे प्रमाण अधिक असावे. रात्री सात ते आठच्या वेळात एका खोलीत गर्भ जाळून नंतर ते परिसरातील कचराकुंड्यांमध्ये टाकण्याचा उद्योग डॉ. गायकवाड (रा. रोजाबाग) करत होती. अविवाहित असलेल्या गायकवाडने २० वर्षे मनपात वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोगतज्ज्ञ नव्हे) म्हणून काम पाहिले. २०१४ मध्ये निवृत्त झाल्यावर मनपाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य मिशनमध्ये कार्यरत होती. काही महिन्यांपूर्वी दवाखाने, सोनोग्राफी सेंटर तपासणी पथकात तिचा सहभाग होता. पोलिस कारवाईनंतर तिला मनपा सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून तिची मदतनीस शांता गोकुळ सातदिवेच्या निलंबनाची प्रकिया सुरू झाली असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी म्हणाल्या. गायकवाडसोबत मनपा आरोग्य विभागातील आणखी काही कर्मचारी आहेत का याचीही चौकशी होणार आहे.
 
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, नेमके रॅकेट कसे चालायचे? 
बातम्या आणखी आहेत...