Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | news about Illness in jalgaon

‘अस्वस्थ’ शहर: ‘दिसला प्लॉट, टाकला कचरा’... आपल्याचसवयीने घराघरांत फैलावतोय डेंग्यू

प्रतिनिधी | Update - Oct 11, 2017, 10:03 AM IST

हागणदारी मुक्ती, स्वच्छता अभियानासारखे उपक्रम राबवूनही केवळ ‘दिसला मोकळी जागा की टाक कचरा’ या वाईट सवयीमुळे शहरातील घराघ

 • news about Illness in jalgaon
  जळगाव- हागणदारी मुक्ती, स्वच्छता अभियानासारखे उपक्रम राबवूनही केवळ ‘दिसला मोकळी जागा की टाक कचरा’ या वाईट सवयीमुळे शहरातील घराघरांमध्ये डेंग्यू,चिकुनगुन्या, मलेरियासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव होतो आहे. शहरात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक मोकळे,ओसाड भूखंड अाहेत. यापैकी अत्यंत उच्चभ्रू वसाहतींमध्येही मोकळ्या भूखंडांवरील घाणीमुळे शेजारच्या घरे,बंगल्यांमधील रहिवाशांना डेग्यू, चिकुनगुन्या आणि मलेरियाची लागण झाल्याची उदाहरणे दिसून आली आहेत.

  कमी पाऊस आणि दमट हवामानामुळे आधीच वातावरण खराब झाल्याने डास, किटकांची उत्पत्ती वाढली आहे. यात शेजारच्या अंगणात कचरा टाकण्याच्या पारंपरिक मानसिकतेमुळे साथीचे आजार वेगाने फैलावत असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या सर्वेक्षणात समोर आले अाहे. साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ टीमने स्वातंत्र्य चौक, आदर्शनगर, गणपतीनगर, महाबळ, त्र्यंबकनगर या उच्चभ्रू वसाहतींमध्ये फेरफटका मारला असता, घराशेजारील कचऱ्यामुळे शहरातील काही नामवंत डॉक्टरही डेंग्यूमुळे आजारी पडल्याचे धक्कादायक वास्तव खुद्द त्या डॉक्टरांनीच कथन केले. त्यामुळे आता महापालिकेसोबतच काॅलनीवासीय,सामजिक,स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन दिवाळीच्या तोंंडावर ही स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज आहे.

  पाच लाख लाेकसंख्येच्या जळगाव शहरात ३०० पेक्षा जास्त लहान- माेठे दवाखाने असून सद्य:स्थितीत दाेन हजारापेक्षा जास्त डेंग्यूचे तसेच चिकुनगुन्याचे रुग्ण अाढळले अाहेत. पॅथाॅलाॅजीतूनही दरराेज पाच ते सहा रुग्णांना डेंग्यू असल्याचा अहवाल दिला जात अाहे. शहरात दरराेज ३० पेक्षा जास्त रुग्ण डेंग्यू संशयित अाढळत अाहेत. डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यात हाेत असला तरी चिकुनगुन्याला मात्र दिवसा तसेच रात्री चावणाऱ्या डासांचा डंख कारणीभूत ठरत अाहे. रस्ते, गटारी साफ केल्या तरी गल्लाेगल्ली असलेल्या खासगी भूखंडाच्या माध्यमातून उत्पत्ती हाेत असलेल्या डासांवर नियंत्रण मिळवणे हे अाणखी एक अाव्हान पालिका प्रशासनासमाेर उभे ठाकले अाहे. शहरात १२ हजारांपेक्षा जास्त खासगी भूखंड असून या भूखंडावरील कचरा तसेच गवत झुडुपांमुळे डासांसाठी पाेषक वातावरण तयार हाेत अाहे.

  श्रमदानातून केली साफसफाई
  महाबळप रिसरातील महाराष्ट्र बंॅक काॅलनीतही माेकळ्या भूखंडावर घाण केली जात हाेती. स्थानिक नागरिक काळजी घेत असले तरी परिसरातील सगळ्यांनाच त्याची जाणीव नव्हती. अखेर शहरात डेंग्यू चिकुनगुन्ययाची साथ पसरली. त्याचा फटका स्थानिकांना झाला. त्यामुळे काॅलनीतील नागरिकांनी श्रमदानातून दाेन प्लाॅट चकाचक करून टाकले. नागरिकांनी पुढाकार घेतल्यास अापला परिसर स्वच्छ राहु शकताे. याचे उदाहरण महाराष्ट्र बंॅक काॅलनीने घडवल्याची माहिती नगरसेविका अश्विनी विनाेद देशमुख यांनी दिली.

  दरराेज २५ रुग्णांची भर
  महापालिकेच्या दप्तरी अातापर्यंत ६५० पेक्षा जास्त डेंग्यू संशयित रुग्णांची नाेंद अाहे. तर खासगी डाॅक्टरांकडील माहितीनुसार हा अाकडा दाेन हजार पलीकडे गेला अाहे. यात १५० पेक्षा जास्त चिकुनगुन्याचे रुग्ण असल्याचा अंदाज व्यक्त हाेत अाहे. दरराेज शहरात २५ ते ३० रुग्णांची भर पडली अाहे. विशेष म्हणजे हाेमिअाेपॅथीक डाॅक्टर रितेश पाटील, स्त्रीराेगतज्ञ डाॅ. विलास भाेळे यांना डेंग्यूची लागण झाली अाहे. तसेच प्लास्टिक सर्जन डाॅ. शिरीष चाैधरी यांनाही वैद्यकीय उपचार घ्यावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  जबाबदारी भूखंड मालकांची
  शहरातील खासगी भूखंडामध्ये तयार हाेणारे गवत, झुडुपांची साफसफाई करण्याची जबाबदारी ही संबंधित जागा मालकाची असते. पालिका या जागा मालकांना दरवर्षी खुला भूखंड कराचे बिल पाठवते. परंतु जागा मालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने भूखंड मालकांच्या नावावर माेठ्या प्रमाणात थकबाकी निर्माण हाेत असते. शहरात सद्य:स्थितीत सुमारे १२ हजारापेक्षा जास्त खासगी भूखंड अाहेत. त्यात असलेली घाण अाजूबाजूच्या नागरिकांसाठी अाराेग्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरत अाहे. विशेष म्हणजे गवत झुडुपांव्यतिरीक्त खुल्या जागांमध्ये हाेणारा कचरा याला अाजूबाजूचे नागरिकही तेवढेच जबाबदार अाहेत.

  पालिकेचे बदलते धाेरण कारणीभूत?
  नगरपालिका असताना ३१ मार्च २००१ पर्यंत रुपये चाैरस मीटर प्रमाणे खुले भूखंडावर कराची अाकारणी हाेत हाेती. त्यानंतर २००१ ते २००५ दरम्यान रेडी रेकनरनुसार अाकारणी करण्याचा निर्णय घेतला. २००५ मध्ये पुन्हा ठराव करून रुपये चाैरस मीटरने अाकारणी करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी २००८ पर्यंत करण्यात अाली.

  मालमत्ता कर परवडणारा
  भूखंडधारकांना दरवर्षी कराचा भरणा करणे परवडणारे नसते. त्यामुळे जागेची विक्री अथवा बांधकाम करण्याची परवानगी घेताना हे साेपस्कार पार पाडले जातात. जळगाव महापालिकेने इतर महापालिकांचा अभ्यास करून याेग्य धाेरण ठरवल्यास खुले भूखंडावरील कराचा भरणा हाेऊन त्याच पैशातून भूखंडांची साफसफाई करणे सहज शक्य हाेणार अाहे. सध्या मनपात भूखंड कराची टक्के वसुली हाेत अाहे.

  अादर्शनगरात रस्ते चकाचक असले तरी माेकळे प्लाॅट मात्र घाण केले जातात. कचराकुंडी समाेर दिसत असतानाही अनेक जण चालत्या वाहनावरून कचऱ्याच्या पिशव्या फेकतात. घरकाम करणाऱ्या महिला शिळे अन्न, कचरा टाकून माेकळ्या हाेतात. अनेकदा सूचना केल्या परंतु उपयाेग हाेत नाही. प्रत्येकाला अापल्या घराचा परिसर स्वच्छ हवा परंतु दुसऱ्याचा कुठेही विचार केला जात नसल्याची भावना अादर्शनगरातील रहिवासी अरुण कुळकर्णी यांनी व्यक्त केली.

  बिघडलेल्या आरोग्याचे वास्तव
  १२ हजारमोकळे भूखंड शहरात
  २००० संशयित; डॉक्टरांचा दावा
  ३० पेक्षाजास्त रोज पडताहेत आजारी
  १५० चिकनगुन्याने आजारी
  ६५० डेंग्यूसं शयित, पालिकेचा आकडा
  ०२ % कर वसुली मोकळ्या भूखंडातून

  बाेलून बाेलून थकलाे लोकं ऐकत नाही
  संपूर्णशहरात पाॅश एरिया अशी अाेळख असलेला गणपती नगराचा भागही या समस्ये पासून वेगळा ठरलेला नाही. पवन अडवाणी या तरुणाच्या घराशेजारील खुली जागा म्हणजे कचरा टाकण्याचे ठिकाण झाले हाेते. म्हणून जागा मालकाने तारेचे कंपाउंड करून घेतले परंतु अडवाणी कुटुंबातील काेणीही बाहेर नसल्याचा फायदा घेत परिसरातील रहिवासीच त्या जागेत कचरा टाकतात. त्यामुळे डासांचा प्रचंड त्रास हाेत असून पाऊस पडल्यावर दुर्गंधी पसरते. कितीही बाेला परंतु काहीही उपयाेग हाेत नसल्याची व्यथा पवन यांनी दिव्य मराठीशी बाेलताना व्यक्त केली.

  कंटेनर नसल्याने कचऱ्याने व्यापला रस्ता
  राष्ट्रवादीकार्यालयापासून हाकेच्या अंतरावर चार हाॅस्पिटल असून या रस्त्यावर दिवसभर हजाराे लाेकांचा वापर असताे. अॅपेक्स हाॅस्पिटलला लागून तसेच अटल विश्वप्रभा हाॅस्पिटलपासून हाकेच्या अंतरावर रस्त्यावरच कचरा साचलेला अाहे. त्या ठिकाणचे लाेखंडी कंटेनर खराब असल्याने उचलण्यात अाले. त्यामुळे कचऱ्याने अर्धा रस्ता व्यापला अाहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणाऱ्या यंत्रणेचीच प्रकृती बिघडण्याची स्थिती अाहे. डाॅ. राजेश पाटील यांनी यासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा करून कंटेनरची मागणी केली अाहे.

  जागा मालकाला भेटून व्यथा मांडणार
  टेलीफाेनअाॅफीससमाेर डाॅ. विलास भाेळे यांचे हाॅस्पिटल अाहे. त्यांच्या घराच्या शेजारी काॅर्नरला भला माेठा प्लाॅट अाहे. या परिसरात एकमेव खुला भूखंड असल्याने येणारा जाणारा प्रत्येक जण साेयीचे ठिकाण म्हणून त्या जागेत कचरा टाकतात. अाता तर त्या प्लाॅटमधील झाडी उंच वाढली असून त्यात माणूस शिरला तरी दिसणार नाही, अशी परिस्थिती अाहे. डासांचा त्रास एवढा वाढला अाहे की त्यामुळे खु्द्द डाॅ. भाेळे यांनाच डेंग्यू निष्पन्न झाला अाहे. वारंवार सूचना करूनही काहीही हाेत नसल्याने अाता जागा मालकाची भेट घेऊन व्यथा मांडेल, असे डाॅ. भाेळेंनी सांगितले.
 • news about Illness in jalgaon

Trending