आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फालतू धंदे मत कर’, भावाने समजावले, मात्र इम्रानला उमगले नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘ये फालूत धंदे बंद कर, अपने कामकाज पर ध्याने दे’, असे इम्रान मोहज्जम पठाणच्या भावाने त्याला समजावले होते. मी भावाचे ऐकले असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती, अशी कबुली देखील इम्रानने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

दोन दिवसापूर्वी इम्रानला एनआयए व एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वैजापूर येथून ताब्यात घेतले. तो जनूद -उल -खलिफा- ए -हिंद या दहशतवादी संघटनेशी संलग्न इसिसमध्ये जाण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांची तो भरती करत होता, असा संशय एनआयएला आहे. वैजापूर आणि औरंगाबादला शिक्षण घेत असताना एक हुशार मुलगा म्हणून इम्रानची ओळख होती. इम्रानने शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो मुंबईच्या तुर्भे एमआयडीसीत काम करत होता. मुंब्रा येथे नातेवाइकांकडे राहत होता. त्या वेळी त्यांचा संपर्क मुदब्बीर मुश्ताक याच्याशी आला. तो स्वत:ला जनूद -उल -खलिफा- ए- हिंद या संघटनेचा आमिर म्हणवून घेई. मुंब्रा येथील वातावरणाचा त्याच्यावर प्रभाव होता. नोकरी सोडून वैजापूरला आल्यानंतर त्याच्या भावाने त्याला समजावले होते. मात्र इम्रानने त्याकडे दुर्लक्ष केले. सध्या इम्रान एनआयएच्या ताब्यात आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, शाळांतून केलेजात आहे समुपदेसन