आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भौतिक जीवनापासून मुक्तीसाठी ‘हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट’ने उभारले नि:शुल्क केंद्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रगत देशांमध्ये भोगवादी वृत्ती म्हणजेच भौतिकवादी जीवन पद्धतीत वृद्धी होते आहे. यातून मुक्ती मिळवण्याच्या प्रयत्नासाठी अनेक जण कर्मकांड, अध्यात्म, विपश्यना आदींचा मार्ग निवडतात. ‘हार्टफुलनेस’ हा ध्यानधारणेचा नवा पर्यायही उपलब्ध आहे. सिडकोच्या (वाळूज) साऊथ सिटी येथील श्री रामचंद्र मिशनने नि:शुल्क ध्यानधारणा केंद्र सुरू केले आहे. जात, धर्म, पंथ, भाषांचे भेद गाडून येथे हृदयाद्वारे साधक एकमेकांशी जोडले जातात, हेच या केंद्राचे खास वैशिष्ट्य आहे. 
 
‘योगा कर्मसुख कौशल्यम’ गीतामध्ये म्हटल्याप्रमाणे भौतिक जीवनाचा कंटाळा आला तर अध्यात्म त्यावर उपाय आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर येथील न्यायपालिकेत कारकून म्हणून नोकरीला असलेल्या रामचंद्र फतेहगड यांनी ‘हार्टफुलनेस’च्या माध्यमातून स्वत: आधी अनुभूती घेतली. त्यानंतर त्यांनी १९४५ दरम्यान श्री रामचंद्र मिशनची स्थापना केली. हृदयाच्या माध्यमातून ध्यानधारणा करण्याची प्रक्रिया आता प्रचलित झाली असून १३० पेक्षा अधिक देशांमध्ये केंद्रे सुरू झालेली आहेत. विश्वात लाखांपेक्षा अधिक साधक ‘हार्टफुलनेस’शी जोडले गेले आहेत. औरंगाबादेतही दोन दशकांपासून सुप्तपणे अशी केंद्रे घरोघरी चालवली जात आहेत. वाळूज रोडवरील (सिडको) साऊथ सिटीच्या प्लॉट नंबर-६०१ वर ‘हार्टफुलनेस’चे सुसज्ज केंद्रच आता उभारण्यात आले आहे. विविध साधकांनी दिलेल्या आर्थिक योगदानातून सव्वा कोटी खर्चाचे हे केंद्र आता उभे राहिले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे. येथे दररोज सकाळी साडेसहा ते साडेसातपर्यंत ‘प्राणाहुती’ या ध्यानधारणेची अनुभूती घेता येते. ५०० साधक एकाच वेळेला या केंद्रात ध्यानधारणा करू शकतात, अशी सुसज्जता येथे आहे. देशपातळीवर कमलेश पटेल, तर औरंगाबादेत डॉ. प्रकाश अडवाणी मिशनचे काम सांभाळत आहेत. चित्त एकाग्र करणे, हृदयाच्या खोलीत शिरणे, मनाला नियंत्रित करण्यासाठी येथे विविध व्हिडिओंच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. एंड्रेस प्लस हाऊजरचे रूपेश कोलाले, डॉ. अनिल खुत्ताबादकर, जगन मोहन, सुरेश फुलारे आदींच्या प्रयत्नातून येथे मास्टर क्लासेस आयोजित केले जात आहेत. 

वर्षातून चार विशेष शिबिरे 
वर्षातून चार वेळा येथे विशेष शिबिरांचे आयोजन केले जाते. श्री रामचंद्र यांच्या जयंतीनिमित्त फेब्रुवारीला तीनदिवसीय शिबिर, त्यांचे बंधू बाबूजी यांच्या जन्मदिनानिमित्त ३० एप्रिलला शिबिर घेतले जाते. २४ जुलै रोजी पार्थसारथी राजगोपालचारी यांच्या, तर कमलेश पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त २८ सप्टेंबरला शिबिरांचे आयोजन केले जाते. 
 
पुढील स्लाईडवर वाचा,घर सोडून जाण्याची गरज नाही 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...