आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षी महोत्सव: देशविदेशातून येणार्‍या पक्षांना बघण्यासाठी नाथसागरावर पक्षीप्रेमींची गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व फोटो वाइल्डलाईफ फोटोग्राफर समीर खान यांनी काढले आहेत. - Divya Marathi
सर्व फोटो वाइल्डलाईफ फोटोग्राफर समीर खान यांनी काढले आहेत.
औरंगाबाद- वेळ सकाळच्या 5 वाजताची. त्यात कडाक्याची थंडी. प्रचंड उत्साह तो म्हणजे, पैठणच्या जायकवाडी येथे जाण्याचा. हे कशासाठी तर देशविदेशातून येणार्‍या पक्षांना न्याहाळण्याचा.

पैठण येथील नाथ सागराच्या (जायकवाडी धरण) काठावर नुकताच आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव पक्षीमित्र तसेच पक्ष‍ीप्रेमींना साजरा केला. ग्रे हेरॉन, स्पॉट बील डक, ब्लक हेडेड डक, गॉडविस्ट, किंगफशर, प्लोव्हिर, रेडिशेल डकसह हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो (रोहित) पक्षांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह देशभरातून पक्षीप्रेमींनी या महोत्सवात सहभाग घेतला. 
 
मागील 4 वर्षांच्या तुलनेत यंदा उत्तम पर्जन्यमान झाल्याने नाथसागर परिसरातील बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात साचले आहे. परिणामी सायबेरिया, इंग्लंडसह विविध देशातून येणारे परदेशी पाहुण्यांची संख्या रोळावली होती. याचे मुख्य कारण म्हणजे, जास्त पाणी साजल्याने  पाण्यात येणारे शैवाळ कमी आहे. यामध्ये शैवाळातून हे पक्षी स्वत: चे अन्न मिळवतात. हजारो किलोमीटरचा प्रवास करून नाथसागरावर मुक्कामाला आलेले बहुतांश पक्षी अळ्या, किटकांवर आपल्या उदरनिर्वाह भागवतात.

4 साईट्‍सवर पक्षीप्रेमींनी लुटला आनंद...  
नाथसागर परिसरात असलेल्या 4 साईटवर पक्षीप्रेमींनी सकाळी 67 जातींचे पक्षी न्याहाळण्याचा आनंद लुटला. पक्षीप्रेमींना त्यांना आपल्या कॅमेर्‍या कैद केले. काहींनी बायनक्युलर दुर्बिन, स्टँड असलेली दुर्बिनीने दूरवर खेळणार्‍या, बागडणार्‍या पक्षांना न्याहाळले. यासोबत पक्षीप्रेमींनी बोचल्या थंडीसह स्वच्छ, आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला. 
 
26 ते 28 डिसेंबरदरम्यान औरंगाबाद वन विभाग तसेच डॉ. दिलीप यार्दी यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सवाचे आयोजन केले होते. 
 
शालेय विद्यार्थ्यांना निसर्ग तसेच वनसंपदेविषयी माहिती व्हावी, तसेच पक्षांची जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रतिवर्षी पक्षी‍ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे वन विभागाने सांगितले आहे. 
 
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सावाचे उद्घाटन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विविध पक्षांच्या व्हिडिआे दाखवून पक्षी किती लांबचा प्रवास करतात?  ते कुठून, कसे, कधी आणि का येतात? याविषयी माहिती देण्यात आली. जगभरातून येणार्‍या पक्षांचे खाद्य काय? त्यांचा आवाज, त्यांचे जीवनमान, प्रजननकाळ, शारीरिक  वाढीबद्दल देखील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात अाली. यावेळी विविध पक्षी मित्रांसह तज्ज्ञांनी वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  
 
उपजिल्हाधिकारी, वकील, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, पत्रकार, विद्यार्थी, पक्षी अभ्यासक, संशोधकासह आदींचा समावेश होता.  

'येथे देश - विदेशातून मोठ्या प्रमाणात पक्षांची ये - जा असते. परंतू यंदा चांगला पडलेल्या पावसामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. पक्षी महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असल्याने आम्हाला पक्षी मित्रांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच आमच्याकडून आम्ही पक्षांबद्दलची सर्व चांगली माहिती देण्यासाठी माझ्यासह आमच्या टीमने प्रयत्न केले.' 
- डॉ. दिलीप यार्दी, पक्षी तज्ज्ञ तथा पक्षी मित्र 
 
'या महोत्सवाच्या माध्यमातून आमचा मुख्य उद्देश म्हणजे येथील पक्षी सायबेरिया तसेच इंग्लडसह आलेल्या पक्षांच्या जिवन, खाद्यासह तसेच एकंदरीत त्यांच्या समस्या पक्षी प्रेमींना माहिती व्हावी. तसेच शासनाची निसर्ग तसेच वन विभागाकडून नियमीतपणे चालणार्या उपक्रमांबद्दल माहिती होणे.'   
- कमलाकर धामगे, विभागीय वनअधिकारी, औरंगाबाद 
 
'मी माझ्या व्यस्त जिवनामधून वेळ काढून या महोत्सवाला आले होते. येथे मला मुंबईत न बघता येणारे पक्षी पहावयास मिळाले. यामधून मराठवाड्यातील जल, तसेच वन संपदा बघण्याची चांगली संधी मला मिळाली. मी दरवर्षी येण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे.' 
- श्रीमती फरोघ मुकादम, उपजिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी,
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, हजारो किलोमीटरचा प्रवास करून नाथसागरावर आलेल्या विविध जातींच्या पक्षांचे फोटोज... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)