आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या 350 फायली अर्धवट जळाल्या, जालना पंचायत समितीतील रेकॉर्ड रूमला आग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना येथील पंचायत समितीमधील जुन्या रेकॉर्ड रूमला आग लागून कागदपत्रे ज‌ळाली. (छाया : जावेद तांबोली) - Divya Marathi
जालना येथील पंचायत समितीमधील जुन्या रेकॉर्ड रूमला आग लागून कागदपत्रे ज‌ळाली. (छाया : जावेद तांबोली)
जालना - जुन्या रेकॉर्ड रूमला आग लागून १९९५ ते २००० या वर्षातील ३५० च्या आसपास फायली अर्धवट जळाल्याची घटना पंचायत समितीच्या दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम विभागात मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. ही आग कशामुळे लागली याचा तपास अजून लागला नसल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले. यानंतर अग्निशमन बंब आल्यानंतर ही आग विझवण्यात आली आहे.  
 
पंचायत समिती कार्यालयाचे सकाळपासूनच काम सुरू झाले होते. या ठिकाणी नागरिकांची नेहमी वर्दळ असते. मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास बांधकाम शाखेतून बाहेर धूर निघाल्यामुळे कार्यालय व बाहेरील नागरिकांनी आत प्रवेश करून पाहिले असता आग लागल्याचे लक्षात आले. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर कार्यालयातील अग्निशमन बंबने थोड्या फार प्रमाणात आग विझवली. सुदैवाने इतर विभागांना आगीची झळ पोहोचली नाही. 
 
आगीचे नेमके कारण समजू शकले नाही   
बांधकाम विभागात नेमकी आग कशामुळे लागली हे अजून निष्पन्न झाले नाही. जुने रेकॉर्ड अर्धवट जळाले असल्याचे बांधकाम विभागाचे कार्यालयीन अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...