आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: 2 लाख 30 हजार जनधन बँक खात्यांत दमडीचाही व्यवहार नाही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यात जनधन अकाउंटची संख्या सातत्याने वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 7 लाख हजार ८४२ जनधन खाती उघडली. मात्र, त्यापैकी 2 लाख ३० हजार २३९ खात्यांत एक छदामही जमा नाही. या खातेधारकांपैकी रुपे कार्ड न वापरणाऱ्यांची संख्या पावणेदोन लाखांपेक्षा अधिक आहे. 
 
२०१४ मध्ये सुरू झालेल्या जनधन योजनेअंतर्गत झीरो बॅलन्सवर खाते असल्यामुळे लोकांनीदेखील तुफान गर्दी करत खाते उघडले होते. औरंगाबाद जिल्ह्यात या योजनेला सुरुवातीपासून जोरदार प्रतिसाद मिळाला. ०७ डिसेंबर २०१६ पूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात लाख ९६ हजार ९१७ खाती उघडण्यात आली होती. जनधन खात्याचा वापर खातेधारकांनी व्यवहार करण्यासाठी, पैसे बचत करण्यासाठी करावा. रुपे कार्ड वापरल्यास जनझन खातेधारकांना विमा कवचही मिळणार आहे. ज्यांनी रुपे कार्डचा वापर केला नाही त्यांनी त्यांचे रपे कार्ड घेणे गरजेचे आहे, असे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप कुतवल यांनी सांगितले. 
 
रुपे कार्डचाही वापर नाही 
औरंगाबादजिल्ह्यात असणाऱ्या लाख खातेधारकापैकी 7 लाख ८८ हजार २५२ लोकांनी त्याचे आधार लिंक केले आहेत. अजूनही 5 लाख १३ हजार ५९० खातेधारकांनी त्याचे आधार लिंक केलेले नाहीत. तसेच 1 लाख १० हजार ३६२ लोकांनी रुपे कार्ड घेतले आहे, तर 5 उर्वरित एक लाख ९१ हजार ८४० लोकांनी रुपे कार्ड घेतलेले नाहीत. 
 
पैसे मिळतील म्हणून उघडली खाती 
जनधनमध्ये पैसे मिळणार या आशेने लोकांनी खाती उघडली आहेत. सरकारने त्याचा गाजावाजाही केला होता. प्रत्यक्षात लोकही त्यात व्यवहार करत नसल्याचे पाहायला मिळते. खाते उघडताना सरकार जसे मिरवत होतेे, तसा व्यवहार मात्र दिसत नाही. 
- देविदास तुळजापूरकर, सहसचिव, एआयबीईए 
बातम्या आणखी आहेत...