आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन जिल्ह्यांतून १५ दिवसांचा प्रवास, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सध्या १०.५० टक्के आहे. या पाण्यातून माजलगाव धरणासाठी १.७० टीएमसी पाणी येत्या दोन दिवसांत सोडले जाणार आहे. हे पाणी तीन जिल्ह्यातून सुमारे २१५ कि.मी.चा प्रवास करत १५ दिवसांनी माजलगाव धरणात पोहचेल. दरवेळी सोडलेले पाणी निम्यापेक्षा कमीच पोहचण्याचा इतिहास आहे. याच इतिहासाची आताही पुर्नरावृत्ती होण्याची शक्यता आहे. कारण निम्म्याहून अधिक पाण्याचा अपव्यय होणार आहे. सोडलेल्या पाण्यापैकी या धरणात किती पाणी पोहोचणार हे सांगणे आजमितीस कठीण आहे. जायकवाडीच्या उजव्या कालव्याची आधी कालव्याची दुरुस्ती करा, नंतरच पाणी सोडा, अशी मागणी जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीने केली.

मागील महिन्यात जायकवाडीत १२.८४ टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी वरील धरणांतून सोडण्यात आले होते. ते पाणीदेखील नदीपात्रात वाळू उपसा व मोठमोठे खड्डे पडल्याने झिरपण्याचे प्रमाण ४५ टक्क्यांपुढे राहिले. परिणामी जायकवाडीत ६.४३ टीएमसी पाणी आले. आता या पाण्यात घट होत असताना माजलगावसाठी १.७० टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. मात्र, ज्या उजव्या कालव्यातून हे पाणी सोडले जाणार आहे त्याची दयनीय अवस्था झाल्याने या कालव्याची वहनक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे या कालव्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
माजलगाव धरणाविषयी
सिंदफणा या उपनदीवर ४५३.६४ द.ल.घ.मी. पाण्याचा साठा असलेले माजलगाव धरण आहे. मागील वर्षीही या धरणाचा पाणीसाठा कमी झाल्याने जायकवाडीतून पाणी देण्यात आले होते. मात्र, ते पाणी पंधरा दिवसांतही पोहोचले नसल्याचा इतिहास आहे. त्यात आता पुन्हा पाणी सोडले जाणार असून धरणात किती पोहोचेल, हा प्रश्न पाटबंधारे विभागालाही पडला आहे.
...तर किती पाणी पोहोचेल ते समजेल
^जायकवाडी धरणात सध्या १०.५० टक्के पाणी साठा आहे. त्यातून माजलगावसाठी दोन टीएमसी पाणी सोडल्यास जायकवाडीचा पाणीसाठा ६ ते ७ टक्क्यांवर येईल व माजलगावला किती वेगाने पाणी सोडले त्यावर ते किती पोहोचणार ते समजेल.
अशोक चव्हाण, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग
उजव्या कालव्याची दुरुस्ती करा
^ कालव्याची दयनीय अवस्था पाहता माजलगावला पाणी सोडले तरी ते किती पोहोचणार, असा प्रश्न अाहे. अाधी कालव्याची दुरुस्ती करा, नंतरच पाणी सोडा, अशी मागणी आम्ही केली आहे.
- जयाजी सूर्यवंशी, अध्यक्ष, जायकवाडी पाणी कृती समिती,