आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरणात आज नाशिकचे पाणी 23 हजार क्युसेक वेगाने दाखल होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण  - एक महिन्याच्या विश्रांतीनंतर नाशिक परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नाशिकमधून गोदावरी नदीपात्रात २३ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असल्याने हे पाणी शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत जायकवाडी धरणात दाखल होणार असल्याची माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.  
 
जायकवाडी धरण क्षेत्रात जूनच्या पहिल्या पावसाने एक टक्का पाण्याची वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर एकही पाऊस धरण क्षेत्रामध्ये झाला नसल्याने जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत होती. सध्या धरणात केवळ १७ टक्के पाणीसाठा असून आता नाशिकमधून २३ हजार क्युसेक वेगाने गोदावरीत पाणी सोडले जात असले तरी प्रत्यक्षात जायकवाडी कमी वेगाने पाणी येईल, असा अंदाज असून गोदावरी नदीपात्र ओले असल्या कारणाने पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी राहणार असल्याने दोन दिवसांत धरणाच्या साठ्यात काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला.  
बातम्या आणखी आहेत...