आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळात नाशिकशी संघर्ष; यंदा मुबलक पाण्याचा होतो अपव्यय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- मराठवाड्याला पाणी मिळावे म्हणून दुष्काळाप्रसंगी दोन वर्षे अकरा टीएमसी पाण्यासाठी मराठवाड्याने पश्चिम महाराष्ट्राशी संघर्ष केला असल्याची बाब ताजी असतानाच गतवर्षी समाधानकारक पर्जन्यमानामुळे जायकवाडी धरण ८३ टक्के भरले होते. परंतु सहा सिंचन आवर्तने अन् नियम डावलून तेही विनाखंड दिल्याने यात सुमारे दहा टीएमसी पाणी अधिकचे गेल्याची माहिती समोर आली आहे. एकूण अधिकचे पाणी असले तर त्याचा भरमसाट वापर अन् नसले तर संघर्ष अशी अवस्था मराठवाड्याची दिसत आहे. सध्या धरणातून सहावे पाणी आवर्तन सोडण्यात येत असून पाणी साठा २० टक्क्यांवर आला आहे.
 
मराठवाड्यातील शेती सिंचनासाठी यंदा जायकवाडीत मुबलक पाणी साठा असल्याने सर्व सहा पाणी आवर्तने देण्यात आले. तर अनेक आवर्तनांमध्ये नियमाप्रमाणे आठ दिवसांचा खंड असणे बंधनकारक असतानाही विनाखंड पाणी आवर्तन अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे देण्यात आले. एवढे पाणी देऊनदेखील केवळ ३७ हजार ४७६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. तर यापूर्वीच मराठवाड्यातील दोन लाख हेक्टर क्षेत्र या सिंचन आवर्तनामुळे ओलिताखाली येईल, असा दावा पाटबंधारे विभागाने केला होता. सध्या उन्हाळ्याची सहावे पाणी आवर्तन देण्यात येत असून या दोन-तीन दिवसांत सातव्या आवर्तनास प्रारंभ होईल. पाणी आवर्तनाचे नियोजन पहिल्या आवर्तनापासूनच चुकले असल्याचे दिसून येते. डिसेंबर २०१६ मध्ये गरज मागणी नसताना कालव्यांतून पाणी सोडण्यात आले होते. 

विना खंड आवर्तनाने १० टीएमसी पाणी जास्त गेले 
२१ दिवसांच्या पाणी पाळीत साधारण दिवसांचा खंड ठेवणे आवश्यक असतानाही असा खंड ठेवला गेला नाही. विनाखंड आवर्तनाने धरणातून दहा टीएमसी अधिकचे पाणी सोडले गेले असल्याचे नाव छापण्याच्या अटीवर पाटबंधारे विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकचे पाणी सोडले गेले तरी अत्यल्प सिंचन क्षेत्र ओलिताखाली आले आहे. 

अशी शक्यता नाही 
सिंचनाला सात पाणी पाळ्या देण्यात येणार आहेत. त्यापैकी सहावी पाणी पाळी सुरू असून मागणीप्रमाणे पाणी सोडण्यात आले आहे. यात जास्तीचे पाणी गेले असण्याची शक्यता नाही. अधिक माहिती घेऊन सांगतो. 
- अशोक चव्हाण, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग 

पाणीपाळीचे नियोजन चुकल्याने १० टीएमसीच्या वर जास्तीचे पाणी वापरले गेले. मात्र, यात ही सिंचन कमी झाले कसे याची चौकशी करावी. 
- जयाजी सूर्यवंशी, शेतकरी नेत 

रब्बी हंगाम २०१६-१७ सोडलेले पाणी आवर्तन 
- २८ नोव्हेंबर ते जानेवारी २०१७ दरम्यान १२७. १८० दलघमी पाणी सोडले गेले. 
- जानेवारी ते एक फेब्रुवारीदरम्यान दुसरे आवर्तन ६४.९७६ दलघमी. 
- फेब्रुवारी ते एक मार्चदरम्यान तिसरे आवर्तन ८६.३३२ दलघमी. 
- ते२९ मार्च चौथे उन्हाळी आवर्तन ७६.९५४ दलघमी. 
- एक एप्रिल ते २७ एप्रिल पाचवे आवर्तन ९०.४२० दलघमी. 
- २७ एप्रिल ते सध्या सुरू आहे. यात ८६.९६० दलघमी पाणी देणार. 
- आणखी दोन दिवसांत सातवे पाणी आवर्तन सोडण्यात येईल. 
बातम्या आणखी आहेत...