आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीतून माजलगावसाठी २ टीएमसी पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जायकवाडी धरणातून माजलगावसाठी चार दिवसांत पावणेदोन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. तशी तयारी कडाच्या वतीने सुरू आहे. मात्र, हे पाणी फक्त पिण्यासाठीच असेल. जायकवाडीला सोडलेल्या पाण्यापैकी २५ टक्के पाणी माजलगावला देण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ उमाकांत दांगट यांनी दिली.

माजलगाव धरणात दोन वर्षांपासून पाणी नाही. त्यामुळे बीड, माजलगाव आणि आसपासच्या गावांवर पाण्याचा ताण पडत होता. बीड जिल्ह्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठी वापरले जाईल. वरच्या धरणांतून जायकवाडीत आतापर्यंत ६.६३ टीएमसी पाणी आले आहे. त्यापैकी २५ टक्के वाटा म्हणजेच १.७० टीएमसी पाणी माजलगावमध्ये सोडण्यात येणार आहे. जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून सोडले जाणारे हे पाणी १३२ किलोमीटर अंतर कापून माजलगावला पोहोचेल. जायकवाडीत सध्या १०.६९ टक्के साठा आहे.