आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेईई मेन्ससाठी आता तीन संधी मिळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसह (एनआयटी) देशभरातील अन्य अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेसाठी यंदापासून तीन संधी देण्यात येतील. यामुळे २०१४ मध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही जेईई मेन्स देता येईल.

जेईई मेन्समधून देशभरातील दीड लाख विद्यार्थ्यांना पुढे आयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी असलेल्या जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरवण्यात येते. वाढती स्पर्धा आणि आवडत्या शाखेत प्रवेश मिळण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, केवळ उत्तीर्ण होणे आवश्यक नसून गुणवत्ता यादीतही चांगले रँक मिळायला हवे. यामुळे बऱ्याचवेळा जेईई मेन्समध्ये पात्र ठरूनही विद्यार्थ्यांना हवे ते महाविद्यालय मिळण्यास अडचणी येतात. त्यामुळे बरेच विद्यार्थी पुन्हा तयारी करतात, मात्र आता विद्यार्थ्यांना जास्त वाट पाहण्याची गरज नाही. सीबीएसईच्या नवीन बदलांमुळे २०१४ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थीही यंदाच्या जेईई मेन्स परीक्षेत तिसऱ्यांदा परीक्षा देऊ शकेल.
बातम्या आणखी आहेत...