आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : 120 मीटरचा जाॅगिंग ट्रॅक केला अवघ्या सव्वा लाखात विकसित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जेएनईसीच्या आर्किटेक्चर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी अवघ्या सव्वा लाख रुपयांत सलीम अली सरोवरालगतचा जाॅगिंग ट्रॅक विकसित केला आहे. त्यात इन्स्टाॅलेशन अर्थात मांडणी शिल्पे पर्यावरणाचा खुसखुशीत संदेश चित्रे यांनी १२० मीटर पैकी ५० मीटरचा भाग तयार झाला आहे. 
 
नॅशनल असोसिएशन आॅफ स्टुडंट्स आॅफ आर्किटेक्चर अर्थात नासा इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील एक स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यात वास्तुकलेच्या माध्यमातून करता येण्याजोगे प्रकल्प विद्यार्थ्यांना करून दाखवायचे असतात. 
 
जेएनईसीच्या आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या चमूने या प्रकल्पासाठी सार्वजनिक ठिकाणांचा पुनर्विकास याखाली शहरातील तीन ठिकाणी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यात सर्वात मोठे काम दिल्ली गेटजवळ सलीम अली सरोवराशेजारचा पडीक जाॅगिंग ट्रॅक विकसित करण्याचे आहे. याशिवाय संग्रामनगर उड्डाणपुलाखाली कॅनाॅट प्लेसमधील एक मोकळा कोपरा अशा तीन जागा या विकसित करण्यासाठी निवडल्या गेल्या आहेत. ही कामे वेगात सुरू आहेत. सुशील पाटील, निकिता सावजी, पूजा पाटील, झैनब कबिरा यांच्या नेतृत्वाखाली जेएनईसीचे २५ विद्यार्थी शासकीय कला महाविद्यालयाचे १० कलावंंत विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. संग्रामनगर पुलाखालील सुशोभीकरणाच्या प्रकल्पात साया कपूर कॅनाॅट प्लेसमधील प्रकल्पात ऋतुजा तोडरवाल यांच्या नेतृत्वाखालील चमू काम करीत आहे.
 
आमदार इम्तियाज जलील ओपन जिम उभारणार : सुशील पाटील याने सांगितले की, जाॅगिंग ट्रॅकच्या सुशोभीकरणाचा आराखडा विद्यार्थ्यांनीच तयार केला. ट्रॅकशेजारचा ओटा सलग होता त्याचे काही भाग करून तेथे षटकोनी सीटिंग एरिया तयार केला. तसेच दोन दरवाजांच्या चौकटींचा वापर करून तसेच पक्षी या थीमचा वापर करून दोन इन्स्टाॅलेशन्स तयार केली आहेत. याशिवाय तलावाकाठच्या भिंतीवर कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणरक्षणाचे बोलके सचित्र संदेश चितारले आहेत. १२० मीटर लांबीच्या या ट्रॅकपैकी ५० मीटरचे काम संपत आले असून पुढच्या भागात ओपन जिम उभारण्याची तयारी आमदार इम्तियाज जलील यांनी दर्शवली आहे.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, महाविद्यालयाने केली आर्थिक मदत...
बातम्या आणखी आहेत...