आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायाधीशांकडून कलमाचे ‘आेव्हरराइट’, निष्काळजीपणाबद्दल उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाकडून नाराजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद- जिल्हासत्र न्यायालयाने तिघा आरोपींना खुनाच्या प्रकरणात शिक्षा सुनावली असता आरोपींनी खंडपीठात अपील केले. भादंवि कलम ३०० अन्वये शिक्षा दिल्याचे सत्र न्यायालयाच्या आदेशात नमूद होते. मात्र, निकालाचे ३५ क्रमांकाचे पान गहाळ असल्याने खंडपीठाने प्रकरण चौकशीसाठी प्रधान सत्र न्यायाधीशांकडे पाठवले. 
 
मात्र, खंडपीठात प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सत्र न्यायाधीशांनी कुठलीही पूर्वपरवानगी घेता आपली चूक दुरुस्त करत भादंवि ३०० कलमावर आेव्हरराइट करून ३०४ (।।) केल्याबद्दल खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. एल. आंचलिया यांनी सत्र न्यायाधीशांच्या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली. 
 
मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंडू उर्फ पंडित शंकर जाधव याचा ११ मार्च २००९ रोजी होळीच्या दिवशी खून झाला. खुनाच्या गुन्ह्यात संतोष राठोड, सुरेश राठोड, निकेश राठोड यांच्यासह दारासिंग जाधव यांच्यावर भादंवि कलम ३०२, ३२३, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला. 
 
प्रकरणात दारासिंग जाधवला ३०२ खाली जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. इतर तिघांना कलम ३०० ३४ नुसार दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोन हजार रुपये आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच भादंवि कलम ३०७ ३४ खाली सात वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीशांनी हे आदेश नोव्हेंबर २०१६ रोजी दिले. 

 
तीन बंद्यांनी अॅड. अतुल कराड यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले. भादंवि कलम ३०० अन्वये अपवादात्मक खुनाची व्याख्या करण्यात आली असल्याचा युक्तिवाद कराड यांनी केला. प्राथमिक सुनावणीत १४ डिसेंबर २०१६ रोजी खंडपीठाने नोटीस बजावली. 
 
जिल्हा सत्र न्यायाधीशांनी भादंवि कलम ३०० नुसार सुनावलेली शिक्षा आणि आदेशातील ३५ क्रमांकाचे पान गहाळ असल्याबद्दल विचारणा केली. प्रधान सत्र न्यायाधीशांकडे यासंबंधीचा अहवाल १७ जानेवारी २०१७ रोजी सादर करण्यास सांगितले. या प्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीशांनी चौकशी करून खंडपीठास अहवाल सादर करणे अपेक्षित होते. 
 
परंतु तसे करता त्यांनी हायकोर्टाकडून आलेले सर्व रेकॉर्ड अतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडे पाठवले. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना भादंवि कलम ३०० च्या जागेवर आेव्हरराइट करून ३०४ (।।) करून पाठवले गहाळ असलेले ३५ क्रमांकाचे आदेशातील पानही त्यास जोडले. खंडपीठाने या प्रकरणात तीव्र नाराजी व्यक्त करत प्रकरण निष्काळजीपणे हाताळल्याचे नमूद केले. 
 
तिघांना जामीन : खंडपीठाने तिघांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या बाँडवर जामीन मंजूर केला. प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले. जामिनादरम्यान असा प्रकरचा गुन्हा केला जाऊ नये. तिघांच्या जवळच्या तीन नातेवाइकांची नावे, पत्ता मोबाइल नंबर पोलिस ठाण्यात देण्यात यावा.  
काय आहे कलम ३०० 
भादंविच्या कलम ३०० मध्ये अपवादात्मक खुनाची व्याख्या करण्यात आली अाहे. यात शिक्षेची तरतूद नाही. भादंवि कलम ३०४ (।।) मध्ये अपवादात्मक स्थितीत खुनाच्या गुन्ह्यात दहा वर्षे ते जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. 
बातम्या आणखी आहेत...