आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तैरान कैलास पेनसोन क्लांक काँग चकोवान’; जापानी भाषेत: जगप्रसिद्धकैलास हा विश्वाचा केंद्रबिंदू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीरा रोजपोजचनरत यांना वेरूळची माहिती देताना आमोद बसवले पुरातत्त्व विभागाचे डॉ. शिवाकांत वाजपेयी. - Divya Marathi
वीरा रोजपोजचनरत यांना वेरूळची माहिती देताना आमोद बसवले पुरातत्त्व विभागाचे डॉ. शिवाकांत वाजपेयी.
वेरूळ- जगप्रसिद्ध कैलास हा विश्वाचा केंद्रबिंदू आहे, असे मत वीरा रोजपोजचनरत, मिनिस्टर ऑफ कल्चरल, किंगडम ऑफ थायलंड यांनी त्यांच्या ‘तैरान कैलास पेनसोन क्लांक काँग चकोवान’ या जपानी भाषेत व्यक्त केले. वेरूळ लेणीला गुरुवारी त्यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी लेणीविषयी गौरवोद््गार काढले. पुढे ते म्हणाले की, कैलासाची कारागिरी ही वाखाणण्याजोगी तसेच आश्चर्यचकित करणारी अाहे. 

लेणीमध्ये पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब एका जागी जमा करून साठवण्याची प्रक्रिया ही थक्क करणारी आहे. त्यांनी वेरूळ येथील १६ नंबर कैलास लेणी १० नंबरच्या लेणीत पडणारे पावसाचे पाणी एकत्रित साठवण्याच्या टाक्यांसह पाणी वाहून आणणाऱ्या नाल्यांचीही पाहणी करत माहिती जाणून घेतली. त्यांना पर्यटक मार्गदर्शक आमोद बसवले पुरातत्त्व विभागाचे डॉ. शिवाकांत वाजपेयी यांनी माहिती दिली. या वेळी वेरूळ लेणी संवर्धन सहायक आर. यू. वाकळेकर, अजिंठा लेणी संवर्धन सहायक मनोज पवार, वेरूळ लेणीचे पोलिस कर्मचारी हारुण शेख, योगेश नाडे यांची उपस्थिती होती. 
बातम्या आणखी आहेत...