आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नडच्या सिंचन उपविभागाच्या अधिकाऱ्यांना बजावल्या नोटिसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- वेरूळ येथील येळगंगेमध्ये लाखो रुपये खर्चून अडीच वर्षांपूर्वी बांधलेला सिमेंट बंधारा पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने बांधकामाचे पितळ उघडे पडले. याबाबत "दिव्य मराठी'ने २४ सप्टेंबरच्या अंकात "येळगंगेतील बंधाऱ्याचे पितळ उघडे' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. याची दखल घेत तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी जिल्हा परिषद सिंचन उपविभाग, कन्नडच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून खुलासा मागितला आहे.

वेरूळ येथील माजी सरपंच प्रकाश मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य सतीश फुलारे, काशीनाथ दले, शेख जब्बार शेख बनेमिया, कैलास शेकू शिंदे आदी नागरिकांनी येळगंगेतील वाहून गेलेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. वाहून गेलेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या ठिकाणी नवीन बंधाऱ्याचे बांधकाम १५ दिवसांत सुरू करावे, सिमेंट बंधाऱ्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित अधिकारी-ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा वेरूळ व पंचक्रोशीतील नागरिक आंदोलन करतील, असा इशारा माजी सरपंच प्रकाश पाटील, सतीश फुलारे यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.
१५ दिवसांत बंधाऱ्याचे काम सुरू करा
सिल्लोड, फुलंब्री, कन्नड, औरंगाबाद, खुलताबाद येथील ग्रामस्थ दशक्रिया विधी पार पाडण्याकरिता येथे येतात. वर्षभर पुरेल एवढे पाणी या बंधाऱ्यात असायचे. येळगंगा नदीने जलयुक्त शिवारमुळे मोकळा श्वास घेतला. सध्या नदी वाहत आहे. वाहते पाणी साठवल्यास दशक्रिया विधीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे १५ दिवसांत नवीन बंधाऱ्याचे काम सुरू करावे.
दोषींवर कारवाई करावी
अडीच वर्षांत ९ लाख ८० हजार रुपये खचून बांधलेला सिमेंट बंधारा वाहून गेलाच कसा? जिल्हा परिषद सिंचन उपविभागाच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, ते घरबसल्या कामाची माहिती घेतात व टक्केवारी घेऊन मोकळे होतात. कामाशी काही घेणेदेणे नसल्याचे दिसून येते. भ्रष्ट अधिकारी िनलंबित झालेच पाहिजेत. दिनेश अंभाेरे, उपसभापती, पं.स