आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपनगराध्यक्षपदासाठी 2, स्वीकृत नगरसेवकासाठी 8 उमेदवारी अर्ज, निवडीकडे खुलताबाद तालुक्यातील नागरिकांचे लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - नवनिर्वाचित नगराध्यक्ष एस. एम. कमर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदासह गटनेता व दोन स्वीकृत सदस्य निवडण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने स्वीकृत नगरसेवक पदासाठी ८, तर उपनगराध्यक्ष पदासाठी दोन, असे दहा  उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
 
बुधवारी (२२ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता  नगरपालिकेच्या सभागृहात नवीन उपनगराध्यक्ष, गटनेता व स्वीकृत सदस्य यांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे.  यासाठी २१  फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आली होती. त्या अनुषंगाने एकूण १० अर्ज प्राप्त झाले आहे. 
 
यात काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवकासाठी तीन जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यात सलीम कुरेशी, अॅड. कैसरोद्दीन, अब्दुल समद टेलर, तर शिवसेना-भाजपकडून दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यात रवी तंबारे व अविनाश कुलकर्णी यांचा समावेश आहे. तर तीन इतर लोकांनी भरले आहेत. 
 
यात बाबासाहेब बारगळ, गीताराम काळे व निसार पठाण यांचा समावेश आहे.  तसेच उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून मुनिबोद्दीन मुजिबोद्दीन यांचा, तर सेना-भाजपकडून सुरेश मरकड यांचा समावेश आहे.  या निवडीकडे आता संपूर्ण खुलताबाद तालुक्यातील नागरिकांचे  लक्ष  लागले आहे. 
  
कोण होणार उपनगराध्यक्ष, गटनेता व स्वीकृत सदस्य?   
नगराध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचा असून नगरपालिकेमध्ये सध्याचे बलाबल काँग्रेस ९, भाजप ४, शिवसेना ३, राष्ट्रवादी २  अशी नगरसेवकांची संख्या आहे. पालिकेत काँग्रेस  सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे. त्यामुळे एक स्वीकृत सदस्य काँग्रेसचा होणार, तर भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा  गट म्हणून निवडून आला आहे.
 
 नगरपालिकेच्या वेळेस भाजप- शिवसेना युती करून निवडणूक लढवली होती.  परंतु जि.प. व पं.स. निवडणुकीमध्ये  युती तुटल्यामुळे  मोठा पेच निर्माण झाला आहे. जर  पालिकेसाठीच्या स्वीकृत पदासाठी युती  झाली नाही तर  तिढा निर्माण होईल.
बातम्या आणखी आहेत...