आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या उद्योजकाकडून 30 लाखांची खंडणी, जबर मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - छत्र्यांचीमोठी ऑर्डर घेण्यासाठी वाळूज येथे बोलावून मुंबईच्या छत्री उत्पादक कंपनीच्या मालकाला डांबून आणि अपहरण करून चौघा जणांनी ३० लाख रुपये खंडणी वसूल केली. ही घटना पंढरपूर येथे ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास खंडणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
मुंबईच्या त्रिमूर्ती टॉवर, दयानंद शाळेसमोरील भागात नीलेश जितेंद्र मेहता यांची नॅचरल सेल्स कॉर्पोरेशन नावाची कंपनी आहे. तेथे ते छत्र्यांचे उत्पादन करून बाजारात पुरवठा करतात. त्यांचे वडील जितेंद्र मेहता हेही याच व्यवसायात असून त्यांचीही नॅचरल एंटरप्रायझेस नावाने कंपनी आहे. दोन्ही कंपन्यांकडून विविध ठिकाणी मालाचा पुरवठा केला जातो.
ऑर्डरच्या बहाण्याने बोलावले
१५ते २० दिवसांपूर्वी नीलेश मेहता यांच्या मोबाइलवर कीर्तीलाल कोठारी नावाच्या व्यक्तीने फोन केला. त्याने मेहता यांना "आपल्या छत्र्यांचा दर्जा चांगला असून तो आम्हाला आवडला आहे. त्यामुळे आम्हाला ७२ हजार रुपयांपर्यंत छत्र्यांची ऑर्डर द्यावयाची आहे. मात्र, ही ऑर्डर घेण्यासाठी तुम्हाला वाळूजला यावे लागेल,' असे सांगितले. त्याप्रमाणे मेहता यांचा औरंगाबाद दौरा ठरला. औरंगाबादच्या प्रवासासाठी कोठारीने नीलेश मेहता यांची विमानाची तिकिटेही काढली. मात्र, ते विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच विमान सुटल्याने मेहता ट्रॅव्हल्स बसने ऑगस्ट रोजी सकाळी पंढरपूर येथील तिरंगा चौकात पोहोचले. त्यांनी मोबाइलवरून छत्री खरेदीदार कोठारीशी संपर्क केला. तेव्हा कोठारी याने त्यांना नगर-औरंगाबाद महामार्गावरील अब्बास ट्रान्सपोर्टसमोरील जिंदूत इंडस्ट्रीज या शॉपजवळ बोलावले.

या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कोठारीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत तपास करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...