आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: किराडपुरा भागातील बहुउद्देशीय हॉलचे बेहाल, घाण आणि दुर्गंधीने लोक झाले त्रस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किराडपुरा परिसरातील बारी कॉलनी आणि जसवंतपुरा या वसाहतींच्या मध्यभागी मनपाने कोटी रुपये खर्चून उभारलेल्या बहुउद्देशीय हॉल आणि त्यालगत बांधलेल्या सभागृहाची पार रया गेली आहे. धूळ, कचरा आणि घाणीने माखलेल्या खोल्या, रंग उडालेल्या भिंती आणि दलदलीमुळे येत असलेली दुर्गंधी यामुळे हे सामाजिक सभागृह बकाल झाले आहे. दिवसा शादीखाना आणि रात्री टुकारांचा अड्डा अशी अवस्था झाली आहे. बांधल्यापासून कधी देखभालच व्यवस्थित होत नसल्याने ही अवस्था झाली असल्याचे नागरिक सांगतात. 
 
सामाजिक आरोग्य निकोप राहावे, प्रत्येकाचा सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक विकास व्हावा तसेच सहजीवनाचा आनंद लुटता यावा याशिवाय गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न समारंभ कमीत कमी खर्चात व्हावेत आणि त्यांना हातभार लागावा या हेतूने मनपाने काही वर्षांपूर्वी या दोन्ही गजबजलेल्या वसाहतींच्या मध्यभागी हा बहुउद्देशीय हॉल बांधला होता. पुढे या एकाच इमारतीत गर्दी होत असल्याने तत्कालीन दिवंगत आमदार शालिग्राम बसैये यांच्या स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये खर्चून लगतच सामाजिक सभागृहही बांधण्यात आले. त्याला परमवीर अब्दुल हमीद सामाजिक सभागृह असे नावही देण्यात आले. 
 
काय म्हणतात नागरिक 
पाणी नाही, प्रसाधनगृह नाही की विद्युत उपकरणे नाहीत. मनपाकडून सफाईही होत नाही. सुरक्षा भिंत पडली असून इमारतीचा रंगही उडाला आहे. महिन्यातून ३० ते ४० हजार रुपये उत्पन्न मिळते. त्यातून तरी दुरुस्त्या केल्या जाव्यात.
मुजम्मील शेख, वाजेदअन्सारी, सैैय्यद मिनाज, मोहंम्मद खिजर, राबिया बी. 
 
सारीच रया गेली 
इमारतीची चरया गेली असून सभागृहातील पंखे, विद्युत उपकरणे गायब झाली आहेत. फरशा उखडल्या आहेत. दारे, खिडक्या आणि पत्रे, फरशा गायब झाल्या आहेत. या इमारतींचा स्लॅबही कोसळण्याच्या मार्गावर असून स्वच्छतागृहेही पडली आहेत. मधूनमधून शादीखाना म्हणून याचा उपयोग केला जातो. एरवी टवाळांचा अड्डा येथे पाहायला मिळतो. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...